शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सातारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसाने झोडपलं

By दीपक देशमुख | Updated: May 20, 2024 20:08 IST

अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.

सातारा: सातारा जिल्ह्याला सोमवारी जोरदार वादळी पावसाने झोडपले. सातारा शहरात दुपारी हलका तर सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास जोरदार मुसळधार पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.

सातारा शहर व परिसरात दुपारी हलकासा पाऊस झाला. दिवसातील बहुतांश वेळ ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ढगांमुळे पूर्ण काळोख दाटून आला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. सायंकाळी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या, हॉटेल्समध्ये आसरा घेतला. दरम्यान, उपनगरे आणि ग्रामीण भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

तसेच कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली व परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांचे तसेच शेडवरील पत्रे उडाले. काही शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांचे नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांची झाडे शिवारात कोलमडून पडली. तांबवे परिसरात सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच विद्युत खांब वाकले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तांबवे गावातील नवीन रस्ता कडेला उभी असेले विद्युत खांब वाकले आहेत  तांबवे, आरेवाडी, डेळेवाडी, उत्तरतांबवे, गमेवाडी, साजुर या गावांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

येणपे, लोहारवाडी येथे अनेक घरांवरील पत्रे अँगलसह उडून जाऊन इतरत्र पडले. विद्युत तारा तुटल्याने लोहारवाडीकरांना अंधारात बसावे लागले. सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या लोहारवाडीला वळीवाने रविवारी सायंकाळी झोडपून काढले. जनावरांच्या शेडवरील पत्रा वळवाच्या तडाख्यात उडून नजीकच्या त्यांच्याच घरावर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

वाई शहरासह तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे भाजी मंडईसह शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. सध्या शेतात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने बागायती शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

खटावमध्ये पावसाची हजेरीखटावसह परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजल्यापासून अचानकच विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबागाचा तसेच अन्य शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनानंतर वीज पुरवठा खंडित झाला आहे  पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकजणांनी देऊळ तसेच मोकळ्या मंडपाचा आधार घेतला. बिदाल परिसरात वादळी पाऊसदहिवडी : बिदाल परीसरातील शेरेवाडी येथे सायंकाळी सहाच्या सुमरास सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले. वादळी वारा व पाऊस आल्याने शेरेवाडी येथील शेतकरी किसन बाबुराव भुजबळ यांच्या घरावरील पत्रा उडून धान्य व जिवनआवश्यक वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. तसेच अनेक झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

टॅग्स :Rainपाऊसsatara-pcसातारा