शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

सातारा जिल्हा बँक; आधी ईडीचे पत्र अन् दुसऱ्याच दिवशी नाबार्डकडून सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:54 IST

BankingSector Satara : एका बाजूला ही चौकशी सुरु असतानाच सरकारच्याच नाबार्ड या यंत्रणेनेने सोमवारी जिल्हा बँकेला उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे, याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसातारा जिल्हा बँक; आधी ईडीचे पत्र अन् दुसऱ्याच दिवशी नाबार्डकडून सन्मान! उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार देऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांतर्फे गौरव

सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने (सक्त वसुली संचालनालय) जरंडेश्वर शुगर मिलला केलेल्या कर्जवाटपाची माहिती शनिवारी मागवली होती. एका बाजूला ही चौकशी सुरु असतानाच सरकारच्याच नाबार्ड या यंत्रणेनेने सोमवारी जिल्हा बँकेला उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे, याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.देशातील राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नियंत्रक म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कामकाज करते. या बँकांच्या नियमित बँकिंग कामकाजावर देखरेख ठेवून बँकांच्या प्रगतीचा आढावा घेते. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते दि. १२ जुलै रोजी बँकेला करण्यात आले.जिल्हा बँकांच्या देशाच्या कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्डने त्यांच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित केले होते. याकरिता प्रामुख्याने शेतीसाठी कर्ज पुरवठयामधील सहभाग, वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण कामकाज, तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकांची आर्थिक प्रगती, कर्जवितरण व कर्ज वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ठ नफा क्षमता इत्यादि निकष निश्चित केले होते.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हयाच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी अविरत कार्यरत आहे. बँकेने शेतकरी सभासदांना रुपये ३ लाखापर्यंतचे पीक कर्ज ह्यशून्यह्ण टक्के व्याजदराने ३० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज ह्यशून्यह्ण टक्के व्याजदराने उपलब्ध करुन दिले आहे. विकास संस्था सक्षमीकरणासाठी बँक पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना गत ११ वर्षापासून दरवर्षी रुपये २६ हजार ते रुपये २९ हजार प्रमाणे आजपर्यंत प्रती विकास सेवा सोसायटीस २.८३ लाख रु. वसुली प्रोत्साहन निधी दिलेला आहे.शेतक-यांना व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारात वैद्यकिय उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो . शेतक-यांची आर्थिक अडचण विचारांत घेवून बँकेने शेतकरी ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसि राबविणेचा निर्णय घेतला आहे . या योजनेसाठी बँक आपले उत्पन्नातून रु .१२ कोटी पर्यंत विमा हप्ता भरणार आहे . बँकांच्या ठेवीदारांसाठी अद्याप कुठल्याही बँकेने स्वखर्चातून विमा योजना कार्यान्वित केलेली नाही . सातारा जिल्हा बँकेच्या १० लाख बचत ठेव खातेदारांसाठी १ कोटी खर्च करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन देणार आहे .कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु .१ कोटी १६ लाख, जिल्हयातील मजूरांसाठी रु .१.०० कोटीचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण केले आहे . जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी रु ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.ऑनलाइन पुरस्कार वितरण समारंभास बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.ईडीच्या पत्रानंतर दोन दिवसातच पुरस्कार...कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज वितरण प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालय या तर्फे सुरू आहे. या हा कारखाना जप्त केला असून कारखान्याला ज्या बँकांनी कर्जपुरवठा केला आहे. अशा बँकांची चौकशी देखील सुरू केलेली आहे. शनिवारी ईडीतर्फे सातारा जिल्हा बँकेला कर्ज वितरणाबाबतची माहिती मागवण्यात आली होती. आता दोनच दिवसांमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बँकेचा सन्मान करण्यात आला आहे.रिझर्व बँकेच्या निकषानुसारच जरंडेश्वरला कर्जपुरवठा : शिवेंद्रसिंहराजेसातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना कर्ज पुरवठा केला जातो. जरंडेश्वर शुगर मिल ला देखील रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डने घालून दिलेले जे निकष आहेत, त्याप्रमाणेच कर्जपुरवठा केलेला आहे. संबंधित कारखान्याकडून कर्जवसुली देखील नियमित होत आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जप्ती याच्याशी जिल्हा बँकेचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसर