शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज ---श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:40 IST

जिल्ह्यात आठ विधानसभा व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू आहे. लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूकही होणार असल्याने प्रशासनावर साहजिकच ताण येणार आहे.

ठळक मुद्देमतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रयत्न --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

सागर गुजर ।जिल्ह्यात आठ विधानसभा व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू आहे. लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूकही होणार असल्याने प्रशासनावर साहजिकच ताण येणार आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र दोन्ही निवडणुकांची पूर्वतयारी केलेली पाहायला मिळते. मागील लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पडली. आता ही निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन प्रशासनासमोर असणार आहे.

प्रश्न : निवडणुकीची नेमकी काय तयारी सुरू आहे?उत्तर : लोकसभेसाठी १३ हजार ५०० वोटिंग मशिन्स दाखल झाल्या आहेत. वखार महामंडळाच्या गोदामात या मशिनस ठेवण्यात आल्या आहेत. याची नुकतीच तपासणी केली आहे. तर आठ विधानसभा मतदारसंघांमध्येही मशिन्स पाठविण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्यावरच लक्ष आहे.

प्रश्न : एक खिडकी योजना काय आहे?उत्तर : निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अनेक परवान्यांची गरज असते. हे सर्व परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभेसाठी तर प्रत्येक प्रांत कार्यालयात विधानसभेसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे.

प्रश्न : मतदार जागृती कशी सुरू आहे?उत्तर : मागील लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी तसेच लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, यासाठी अनेक प्रयोग राबवले. याचा परिणाम म्हणजे ४ टक्के मतदान वाढले आहे. तरुण मतदारांमध्ये मोठा उत्साह जाणवतो. प्रशासकीय कर्मचारी तसेच खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी मिळणार आहे.सी व्हीजील अ‍ॅपचा सुयोग्य वापर करानिवडणूक आयोगाच्या ‘सी व्हिजील’ अ‍ॅपमुळे गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही नागरिकांना या अ‍ॅपवर तक्रारी नोंदवता येणार आहेत. या अ‍ॅपबाबत ‘लोकमत’ने जनतेत जी जागृती केली, त्यामुळे निश्चितच असंख्य मतदारांना माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अ‍ॅपचा जास्त वापर करावा. 

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसह लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकीत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, याची विशेष काळजी घेतली आहे. - श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकElectionनिवडणूक