शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  धरणे भरली पण गतवर्षीपेक्षा १२ टीएमसी साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:56 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही.

ठळक मुद्दे धरणे भरली पण गतवर्षीपेक्षा १२ टीएमसी साठा कमीसहा धरणांमध्ये १३४ टीएमसी इतका साठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा प्रमुख सहा धरणात १२ टीएमसीने साठा कमी आहे. सध्या या सहा धरणांमध्ये १३४ तर गतवर्षी १४६.२४ टीएमसी इतका साठा होता.सातारा जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने सुरूवात केली. पूर्व भागासह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील पेरणी वेळेत झाली. मात्र, पश्चिम भाग वगळता पूर्व भागात अपवाद वगळता पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडले. याचा सर्वाधिक फटका माण तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. शेतकºयांच्या पदरी कमी उत्पादन आले. तर पश्चिम भागात जुलै आणि आॅगस्ट महिन्यात धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेसह, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आदी धरणे वेळेत भरली. त्यातच सतत पाऊस असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. असे असलेतरी सध्या मात्र, या धरणात पाणीसाठा कमी आहे. याला कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर