शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : धरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच : कोयनेत २८.१० टीएमसी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:02 IST

सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसºया दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.

ठळक मुद्देधरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच कोयनेत २८.१० टीएमसी साठा; पश्चिम भागात सरी

सातारा : जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसऱ्या दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.यावर्षी जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली. मात्र, काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली होती. असे असतानाच गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. सोमवारपासून पश्चिम भागात संततधार सुरू होती.

महाबळेश्वर, बामणोली, कास, कोयनानगर, नवजा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. बुधवारी मात्र पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला होता. दिवसभर हलक्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होऊ लागली आहे.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८८ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणसाठा २८.१० टीमएमसीवर पोहोचला आहे. तारळी धरण क्षेत्राही चांगला पाऊस सुरू असून, तेथे ४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.साताऱ्यांत उघडीप...सातारा शहरात बुधवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. तीन दिवस साताऱ्यात चांगला पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतीच्या कामांना वेग येणार आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम ०२ (१३१)कोयना ८८ (७३२)बलकवडी ११ (३२३)कण्हेर ०४ (९९)उरमोडी १८ (१२७)तारळी ४७ (२९४)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmonsoon 2018मान्सून 2018