शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वाकलेल्या विद्युत पोलाखाली रोजचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:07 IST

कोरेगाव तालुक्यातील साप येथील बुधावले वस्ती मधील वीज वितरणचा विद्युत पोल घराच्या दिशेला वाकला असल्याने घरासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार वारंवार रहिमतपूर वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देवाकलेल्या विद्युत पोलाखाली रोजचा दिवससाप येथील परिस्थिती : वीज विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील बुधावले वस्ती मधील वीज वितरणचा विद्युत पोल घराच्या दिशेला वाकला असल्याने घरासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार वारंवार रहिमतपूर वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.बुधावले वस्ती येथील गणपत बुधावले यांच्या घरासमोर रस्त्याच्या बाजूला सिमेंटचा विद्युत पोल उभा आहे. गेल्या वर्षभरापूर्वी पावसाळ्यात विद्युत पोल घराच्या दिशेने वाकला सिमेंटचा पोल असल्यामुळे त्याला मधून तडेही गेले आहेत कधीही विद्युत पोल मधून मोडू शकतो किंवा घरावर पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सदर धोकादायक पोल तत्काळ बदलावा, अशी मागणी गणपत बुधावले यांनी ग्रामपंचायत साप व रहिमतपूर वीज वितरण कार्यालयाकडे वारंवार केली आहे. मात्र वीज वितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.नुकत्याच दोन तीन मुसळधार पावसामुळे सदर विद्युत पोल आणखी आगाराच्या दिशेने वाकलेला आहे तो कधीही पडू शकतो. वीज पूल कोसळून जीवित हानी व घराचे नुकसान झाल्यास त्याला वीज वितरणचे संबंधित अधिकारी जबाबदार असतील. तरी धोकादायक वीज पोल तातडीने बदलावा, अशी मागणी गणपत बुधावले यांनी केली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण