शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्लास्टिक बंदीचा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही धसका, १५ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:58 IST

सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून ७५ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीचा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही धसकापाच दिवसांत ७५ हजारांचा दंड वसूल, १५ जणांवर कारवाईसातारा पालिकेची धडक मोहीम

सातारा : सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या  दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून ७५ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.शासनाने महाराष्ट्रात दि. २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू केली. हा निर्णय जाहीर झाल्यापासून सातारा शहरासह जिल्ह्यात पालिका प्रशासनाच्या वतीने यावर काटेकोर अंमलबजाणी केली जात आहे.

सातारा पालिकेच्या आरोग्य पथकाच्या वतीने पाच दिवसांपासून शहरातील कापड व्यापारी, दुकानदार, हॉटेल तसेच हातगाडीधारक यांची तपासणी केली जात आहे. पाच दिवसांत प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलची विक्री व वापर करणाऱ्या शहरातील १४ व्यापारी वदुकानदारांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्रत्येकाकडून पाच हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.पालिकेची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आता नागरिकांसह दुकानदार, व्यापाऱ्यानी पुढाकार घेतला आहे. आपल्याजवळील प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तू नागरिक स्वत:हून घंटागाडीत टाकू लागले आहेत. तसेच अनेकजण प्लास्टिक पिशव्या पालिकेकडे जमा करू लागले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSatara areaसातारा परिसर