शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मालट्रकमधील पोती कारवर पडल्याने कारमधील मुलाचा मृत्यू, चार जखमी

By दत्ता यादव | Updated: May 22, 2023 22:19 IST

Accident: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालट्रक उलटून त्यातील चण्याची पोती कारवर पडल्याने त्याखाली सापडून एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

- दत्ता यादव

सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा गावच्या हद्दीत चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालट्रक उलटून त्यातील चण्याची पोती कारवर पडल्याने त्याखाली सापडून एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अकराच्या सुमारास झाला.

अपूर्व संतोष जाधव (वय १४, रा. भणंग, ता. जावळी, जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भणंग येथील जाधव आणि पवार कुटुंबीय सुटीसाठी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री कारने हे कुटुंबीय परत यायला निघाले. काशीळ गावच्या हद्दीत त्यांची कार आली. त्यावेळी त्यांच्या समोर असलेल्या मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजकाला धडकून मालट्रक उलटला. परंतु मालट्रकमध्ये असलेली चण्याची पोती पाठीमागून येत असलेल्या कारवर पडली. यात चालकाच्या पाठीमागे बसलेला अपूर्व जाधव हा त्याखाली सापडला. या अपघातानंतर बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अपूर्वचा मृत्यू झाला. तर इतर चार जणांना किरकोळ स्वरूपाची जखम झाली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या अपघाताची बोरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

असा झाला अपघातमालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर तो दुभाजकाला धडकला. तेव्हा दुसऱ्या आयशर टेम्पोची ट्रकला धडक बसली. याचवेळी पाठीमागून आलेल्या दोन कारही धडकल्या. यामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.   

टॅग्स :Accidentअपघात