शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वर्ये गावच्या हद्दीत होणार ब्रेक टेस्ट ट्रॅक, जागा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:46 IST

मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यक असून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर केला.

ठळक मुद्देवर्ये गावच्या हद्दीत होणार ब्रेक टेस्ट ट्रॅकजागा निश्चित : विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर

सातारा : मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यकअसून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर केला.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर या प्रस्तावावर जितक्या लवकर निर्णय घेतील, तितक्या लवकर जिल्हावासीयांसाठी महत्त्वाचा असणारा वाहन पासिंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे. लोकमतने या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हा ट्रॅक साताऱ्यात नसल्याने वाहनांचे पासिंग कऱ्हाड येथील उपप्रादेशिक कार्यालयामार्फत करावे लागत आहे.

यासाठी डिझेल, टोल यासाठी पैसे खर्च करून वाहनधारकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. एका दिवसात कामझाले नाही तर आणखी एखादा दिवस हेलपाटा मारावा लागत असल्याने नवीन वाहन घेणाऱ्याच्या खिशाला चाट बसत आहे. याबाबत लोकमतने पाठपुरावा केला. या वृत्तानंतर लोकप्रतिनिधींकडूनही याला प्रतिसाद देत शासन दरबारी गाºहाणे मांडले.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ये, ता. सातारा येथील गायरानाची अडीच हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या सूचनेनंतर ब्रेक टेस्टट्रॅकसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वर्ये ग्रामपंचायतीने तसा ठरावही केला आहे. एक हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात.

मात्र ही जागा त्यापेक्षा जास्त असल्याने त्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सातारकरांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. 

ब्रेक  टेस्ट ट्रॅकचे डिझाईन तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकामखात्याच्या अधिकाऱ्यांची बोलणे झाले आहे. जागा मिळाल्यास कुठल्याही क्षणीहे काम सुरू करता येईल.- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीलोकमतने जिल्हावासीयांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. आता ही जागा लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. आम्ही जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे, येत्या काही दिवसांत हा प्रश्न मिटेल, असे निश्चितपणे वाटते.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष, संकल्प इंजिनिअरिंग व सामाजिक संघटना

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSatara areaसातारा परिसर