शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 17:28 IST

खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोकोखटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पुसेसावळी : खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

हे आंदोलन सुमारे एक तास सुरु होते, यावेळी पुसेसावळी, राजाचे कुर्ले, पारगाव, चोराडे गोरेगाव, वडगाव, कळंबी, वडी, लाडेगाव, उंचीठाणे, रहाटणी यासह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. तसेच आंदोलनावेळी शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही खर्डा-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली.यावेळी शासनाच्याविरोधात घोषणा देत खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत खटाव तालुक्याचा समावेश न केल्यामुळे शेतकरी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार होती मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळी यादीत खटाव तालुक्याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील खटावचा समावेश न झाल्यामुळे हुतात्म्यांच्या भूमीची चेष्टा केली गेली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी शांततेच्या व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलनकरण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळी आलेले वडूजचे नायब तहसीलदार सुधाकर धायिजे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी गावोगावचे राजकीय, सामाजिक शेतकरी संघटना आदी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग उपस्थित होते. या आंदोलनांवेळी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक सुनील जाधव व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

जोपर्यंत दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत या भागात मंत्र्यांना फिरु देणार नाही. दुष्काळ जाहीर न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांत बहिष्कार टाकावा, लोकप्रतिनिधिंनी शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष दयावे.- सचिन नलवडे,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

प्रशासन व पदाधिकारी यांनी आणेवारी देताना लक्ष देण्याची गरज होती; परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तरी शासनाने फेरसर्वेक्षण करुन तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये सामावेश करावा, अन्यथाजनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.- मानसिंगराव माळवे,माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद, सातारा

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर