शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

Satara: बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल एक कोटीचे कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक; ४९ जणांवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: April 5, 2023 14:37 IST

अन् तेव्हा उघडकीस आली बोगसगिरी

सातारा : सातबारा उतारा, तलाठ्याची सही, शिक्का सारं काही बोगस बनवून ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून तब्बल १ कोटीहून अधिक रकमेचं कर्ज काढलं गेलं. मात्र, जेव्हा कर्जाच्या परतफेडची वेळ आली तेव्हा ही बोगसगिरी उघडकीस आली. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने आपली फसवणूक झाल्याची तक्रार मेढा पोलिस ठाण्यात नोंदवली. यावरून पोलिसांनी जावळील तालुक्यातील तब्बल ४९ जणांवर मेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.सचिन उत्तमराव शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब जगन्नाथ अमराळे, सचिन लक्ष्मण जाधव, सचिन बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण सोमन्ना शहाबाद (सर्व रा. आखाडे, ता. जावळी), प्रवीण शिवाजी यादव (रा. आंबेघर, ता. जावळी), कांता चंद्रकांत बेलोशे (रा. बेलोशे, ता. जावळी), महादेव चंदरराव मदने, आदिनाथ यशवंत लोहार, संगम सूर्यकांत जरे, छाया दीपक जाधव (रा. हुमगाव, ता. जावळी, जि. सातारा), संतोष शिवाजी पवार, संतोष बाळासाहेब कदम, सयाजी बाळासाहेब कदम, जयश्री सयाजी कदम (सर्व रा. कुडाळ, ता. जावळी), शिवाजी शंकर करंदर, श्रीराम शंकर करंदकर, मच्छिंद्र शंकर करंदकर (रा. रानगेघर, ता. जावळी), अक्षय भाऊसो दुर्गावळे (रा. सनपाने, ता. जावळी),दिगंबर विठ्ठल गोळे (रा. सनपाने, ता. जावळी) यांच्यासह ४९ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत जावळी तालुक्यातील कुडाळ येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार गणेश भगत (रा. कुडाळा, ता. जावळी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळच्या शाखेत कर्ज घेताना बोगस सातबारा उतारे तयार केले. त्यावर तलाठ्याची खोटी सही व शिक्का मारून हे उतारे खरे आहेत, असे सांगितले. या कागदपत्रावरून बॅंकेने प्रत्येकाला कर्ज दिले. मात्र, या कर्जाची परफेड केली नाही. त्यावेळी बॅंकेने या सर्वांच्या कादपत्रांची पुन्हा शहानिशा केली असता सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. यानंतर बॅंकेच्या वतीने मेढा येथील न्यायालयात फाैजदारी खटला दाखल करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्वांनी मिळून तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम कर्ज घेतल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी आता गुन्हा दाखल झालेल्या ४९ कर्जदारांना चाैकशीसाठी बोलावून अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकfraudधोकेबाजी