शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Satara: साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

By दत्ता यादव | Updated: January 14, 2023 23:08 IST

Satara: सातारा येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली.

सातारा - येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली.

याबाबत माहिती अशी की, सदर बाजार मधील लक्ष्मी टेकडी परिसरात राजेंद्र जाधव यांची कबुतरांची ढाबळ आहे. या ढाबळ मध्ये 50 हून अधिक कबूतर होते. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञाताने कबुतराच्या  ढाबळला आग लावली .त्यामुळे ढाबळमध्ये असलेले 40  कबूतर जागीच मृत्युमुखी पडले. कबुतराच्या ढाबळला आग लागल्याचे समजताच  जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ढाबळ पूर्णपणे जळून खाक झाली होती. ही आग कोणी लावली हे अद्याप समोर आले नसून घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेतली. जाधव यांची कोणासोबत भांडणे अथवा पूर्व वैमनश्य आहे का, याची माहितीही पोलीस घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती  इतक्या मोठ्या संख्येने कबुतरांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर