शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

सातारचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त 

By नितीन काळेल | Updated: August 14, 2024 19:02 IST

मानाचा तुरा : आयएसओ मानांकनात राज्यात कृषीत जिल्हास्तरावरील पहिला मान 

सातारा : सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास १५० ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे आयएसओ मानांकनात कृषी विभागात राज्यात जिल्हास्तरावरील कार्यालयाचा मानही साताऱ्याला मिळाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.कृषी विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, हे मानांकन प्रामुख्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, कार्यालयाची साफसफाई, सुशोभीकरण, प्रत्येक मेजनिहाय सहा गढ्ढे पध्दत, प्रत्येक शाखेची मानक कार्यप्रणाली तयार करणे, शासनाकडील सूचनानुसार प्रसिध्द करावयाचे माहितीदर्शक फलक लावणे आदी बाबींच्या पूर्ततेच्या अधीन राहून केले जाते.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयएसओ मानांकनासाठी आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी परिश्रम घेतले होते. तसेच या कार्यालयातील लेखाधिकारी शीतल करंजेकर यांनीही विशेष महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर १५ ऑगस्टला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण समारंभाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमावेळी याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांचेही याच पध्दतीने मानांकन मिळविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर