शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara- पाडळीतील मानाच्या सासनकाठीचे वाडी रत्नागिरीकडे रविवारी होणार प्रस्थान

By दीपक शिंदे | Updated: March 31, 2023 18:41 IST

छबिना सोहळा झाल्यानंतर काठीला तोफांची सलामी दिली जाईल व त्यानंतर सासनकाठीचा परतीचा प्रवास

नागठाणे : वाडी रत्नागिरी येथील जोतिर्लिंग देवाचे भव्य यात्रेनिमित्त पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे रविवार, दि. २ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आली आहे.वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिर्लिंग हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणूक सोहळ्यात राज्यातील विविध मानाच्या सासनकाठ्या सहभागी होत असतात. त्यात पाडळी येथील मानाच्या सासनकाठीला मानाचे अग्रस्थान असते.यंदा बुधवार, दि. ५ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा देवाची यात्रा होणार आहे. त्या यात्रेत सहभागी होण्यासाठी पाडळी येथील सासनकाठीचे रविवारी सकाळी सहा ते साडेदहा या वेळेत पावक्ताच्या माळावरून प्रस्थान होणार आहे.

त्यानंतर ही सासनकाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसोबत पाली, इंदोली, कासेगाव, किणी वाठार, ऐतवडे, केखले या मार्गाने वाडी रत्नागिरीकडे पोहोचणार आहे. छबिना सोहळा झाल्यानंतर गुरुवारी काठीला तोफांची सलामी दिली जाईल व त्यानंतर सासनकाठीचा परतीचा प्रवास सुरू होऊन सासनकाठी गावाकडे परतेल.यादरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी आरती होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सासनकाठीचे पाडळी येथे आगमन होणार आहे. दरम्यान सासनकाठीचे प्रस्थान व आगमन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJyotiba Templeजोतिबा