शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
4
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
5
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
6
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
7
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
8
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
9
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
10
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
11
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
12
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
13
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
14
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
15
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
16
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
17
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
18
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
19
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?

हक्काच्या पेन्शनसाठी ५० वर्षांपासून सैनिकाचा लढा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:56 IST

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू होतोय एका माजी सैनिकासाठी. मरळीतील या वयोवृद्ध माजी सैनिकावर ‘कुणी पेन्शन ...

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू होतोय एका माजी सैनिकासाठी. मरळीतील या वयोवृद्ध माजी सैनिकावर ‘कुणी पेन्शन मंजूर करून देता का रे पेन्शन..,’अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तीही गेल्या पन्नास वर्षांपासून.भारत-पाक युद्धात एक बोट गमावलेला हा सैनिक आता थकलाय. ते ही म्हणतायत, ‘तुफान आता थकून गेलंय, झाडाझुडपात, डोंगरदºयात अर्ध अधिक तुटून गेलंय, समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळावरती, झुंज, झेप घेऊन-घेऊन तुफान आता थकलंय. जळके-तुटके पंख पालवीत, खुरडत-खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफानपणच नडतंय रे.’े संवाद आहेत. वार्धक्याकडे झुकलेल्या हणमंतराव श्रीपती पाटील या माजी सैनिकाचे.कºहाड तालुक्यातील मरळी गावचे हे सुपुत्र. १९६२ मध्ये भारतीय सैन्यदलाच्या आटलरी तोफखाना विभागात ते भरती झाले. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धात ते सीमेवर होते. या लढाई काळात अपघाताने त्यांच्या हाताच्या बोटाला जखम झाली. जखम चिघळत गेली आणि बोट काढावे लागले. या नंतर ते सक्तीने सैन्यदलातून घरी आले आणि यानंतर गेली ५० वर्षांपासून त्यांचा पेन्शन मिळविण्याबाबतचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.पेन्शन मिळण्याबाबत त्यांनी या ५० वर्षांच्या काळात शेकडो पत्रे, पुराव्यांच्या कागदपत्रांच्यासह विविध ठिकाणी पाठविली आहेत. त्यांनी ही पत्रे पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सैन्यदलाचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, नाशिकचे रेकॉर्ड रुमचे अधिकारी, सोल्जर बोर्ड यांना लिहिली आहेत. मागणी अर्ज केले आहेत. या सर्वांच्या पोहोचही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यातील अनेकांनी त्यांना माघारी पाठवलेली पत्रेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.लालफितीच्याकारभाराबद्दल खंत...माजी सैनिक हणमंतराव पाटील सांगतात की, मला कोणीही पेन्शन नाकारली नाही. पण गेली पन्नास वर्षे प्रत्येक जण आपल्यावरील जबाबदारी झटकून दुसºया विभागाकडे बोट दाखवित आहे. या लालफितीच्या कारभारात मी भरडतोय. आयुष्याच्या संध्याकाळी हे पाटील दाम्पत्य पोटाची दोन वेळची खळगी भरण्यासाठी धडपडत आहे. जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. माझी दोन्ही मुले रोजी-रोटीसाठी परगावी गेली आहेत.