शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर

By admin | Updated: April 22, 2017 17:19 IST

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचा प्रारंभ

आॅनलाईन लोकमत

खटाव (जि. सातारा), दि. २१ : सहकार क्षेत्रामध्ये नवनवीन बदल व कडक कायदे करण्यात आले आहेत. परंतु या सहकार क्षेत्राचे प्रणेते तसेच दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांना अभिप्रेत असणारी विना संस्कार नही सहकार ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. सहकार क्षेत्रात वाढलेला स्वाहाकार थोपवण्यासाटी सर्व सहकार कायद्यावर संस्कार करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. खटाव येथे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश व गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु व सहकार भारतीचे संस्थापक आणि खटाव गावाचे सुपुत्र लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथ यात्रेचा शुभारंभ करताना चरेगावकर बोलत होते. ही रथ यात्रा दि. २३ रोजी मुंबई येथे होणाऱ्या १0 व्या सहकार भारतीच्या प्रदेश अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रदेश संघटक प्रवीण देशपांडे, सातारा जिल्हा संघटक सुरेश जोशी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, युवा मोचार्चे राज्य सरचिटणीस अतुल भोसले, कार्याध्यक्ष महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, मधुकर पाटोळे, अशोक कुदळे, रमणलाल शहा, सहकार भारतीचे जिल्हा संघटक सुरेश जोशी, सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव विनायक खटावकर, मधुकर इनामदार, सुहास जोशी, सुजाता खटावकर, सनी शहा, दिलीप जोशी, डॉ. दर्भे, संजय टकले, रणधीर जाधव, सतीश फडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर) तरच भ्रष्टाचाराला आळा... माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर नेहमीप्रमाणे टिकास्त्र सोडले. शेतकऱ्यांचे कैवारी बनून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. कर्जमाफी करावयाला आमचा विरोध नाही. परंतु सर्वसामान्य शेतकरी हा कर्ज वेळेत भरत आहे आणि टगी मंडळी मात्र कर्ज माफीच्या आशेवर कर्ज फेडत नाहीत. आमची शासनाला व सहकार खाात्याला विनंती आहे की ज्यांनी वेळेत कर्ज फेडली आहेत त्यांचे निम्मे कर्ज शासनाने माफ करावे आणि ज्यांनी कर्जच फेडले नाही त्यांच्याकडून ते सरसकट वसूल करुन घ्यावे. यामुळे सहकार क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार व हुकुमशाहीला लगाम बसेल असे त्यांनी सांगितले.