शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जखिणवाडीसाठी ‘सचिन’चा षटकार

By admin | Updated: August 28, 2014 23:02 IST

सौरव्हिलेज संकल्पना : खासदार फंडातून एक कोटीचा निधी

कऱ्हाड : ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी जखिणवाडीच्या विकासासाठी सुमारे एक कोटीचा निधी दिला आहे़ या निधीचा सौरव्हिलेजसाठी प्रामुख्याने वापर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती सरपंच अ‍ॅड़ नरेंद्र नांगरे-पाटील यांनी दिली़ जखिणवाडीच्या वाटचालीची व मिळालेल्या निधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी उपसरपंच पांडुरंग कणसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, पी़ जी़ पाटील, रामराव नांगरे-पाटील यांच्यासह जखीवाडी ग्रमपंचायत सदस्यांची उपस्थिती होती़ सरपंच पाटील म्हणाले, ‘नुकताच जखिणवाडी गावाने स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळवला आहे़ गावाला आतापर्यंत विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे़ सन २०१० मध्ये निर्मलग्राम, पर्यावरण समृद्धगाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, २०१२ मध्ये तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार, २०१३ मध्ये पंचायत राज, वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार २०१४ मध्ये विकासरत्न, स्वच्छग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे़ तसेच पंचायत राज पुरस्कार व गौरव ग्रामसभा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे़ ग्रामसेवक सदाशिव खांडके यांनाही ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे़ यासर्व पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर यांच्याकडून निधी मिळविण्यासाठी गत वर्षभर पाठपुरावा करीत होतो, त्यांची भेट घेऊन ‘जखिणवाडीची यशोगाथा’ हे पुस्तक त्यांना भेट दिले़ (प्रतिनिधी)जखिनवाडीचा गौरवजखीणवाडी गावाने आजपर्यंत केलेल्या कामाचे पुस्तक वाचल्यानंतर सचिन तेंडूलकर खूप प्रभावीत झाले. त्यांनी ग्रामस्थांची आस्थेने चौकशी केली. तसेच या गावाच्या उत्कर्षाची दखल घेत स्वत:च्या खासदार फंडातून सुमारे एक कोटीचा निधी जखीणवाडीला दिला आहे़ यातून सौरव्हिलेज बरोबरच सिमेंट काँक्रीटच्या बंदिस्त गटारीही बांधण्यात येणार आहेत़ ‘जखिणवाडीची यशोगाथा’ या पुस्तकाची पाहणी खासदार सचिन तेंडुलकर यांनी केली. समवेत सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील उपस्थित होते. त्यानंतरच त्यांनी या गावाच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली.