शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

सातारा शहरात ‘गिरीप्रेमी ८००० क्लब’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:27 IST

सातारा : येथील सातारा रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेली संस्था गिरीप्रेमी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरामध्ये ‘गिरीप्रेमी ८००० क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते या क्लबचे समन्वयक डॉ. संदीप श्रोत्री, मिलिंद हळबे आणि रानवाटा मंडळाच्या अध्यक्षा सीमंतिनी नूलकर यांना या अनोख्या क्लबची सूत्रे सोपविली व क्लब स्थापन झाल्याची अधिकृत घोषणा केली.

सातारा : येथील सातारा रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेली संस्था गिरीप्रेमी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरामध्ये ‘गिरीप्रेमी ८००० क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते या क्लबचे समन्वयक डॉ. संदीप श्रोत्री,  मिलिंद हळबे आणि रानवाटा मंडळाच्या अध्यक्षा सीमंतिनी नूलकर यांना या अनोख्या क्लबची सूत्रे सोपविली व क्लब स्थापन झाल्याची अधिकृत घोषणा केली.

दरम्यान,  सातारा जिल्ह्यातील साहसी पर्यटन अधिक सुरक्षित व्हायला हवे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या क्लबची स्थापना झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक फारोख कूपर, मुंबई येथील उद्योगपती आणि गिर्यारोहक जयसिंह मरीवाला, गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आनंद पाळंदे,  लेखिका  उषप्रभा पागे, एव्हरेस्टसह अनेक गिरीमोहीमा यशस्वी करणारे उमेश झिरपे हे उपस्थित होते. सातारा जिल्ह्याला साहसी गिर्यारोहण, ट्रेकिंग, वन्यजीव अभयारण्ये, तसेच रॅपलिंग आदी क्रीडा प्रकारांना निमंत्रण देणाºया निसर्गाचे वरदान मिळालेले आहे. रानवाटा मंडळ नेहमीच अशा पर्यावरणप्रेमी पर्यटनाला प्रोत्साहन देत असते.

सध्या अशा साहसी क्रीडाप्रकारांमध्ये उतावळ्या आणि सवंग प्रसिद्धी मिळविणाºया तरुणाईचे आणि अशा मोहिमा पूर्वतयारी न करता केवळ गल्लाभरू आयोजक संस्थांचे पेव फुटलेले आहे. अपुºया तयारीनिशी आणि अचूक माहिती न घेता अशा मोहिमा राबविल्या जातात आणि कितीतरी उतावीळ आणि अतिउत्साही तरुण त्यामध्ये बळी पडतात. आपल्या जिल्ह्यामध्ये साहसी पर्यटन सुरक्षित व्हायला हवे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे ‘गिरीप्रेमी ८००० क्लब-सातारा विभाग’ या क्लबची रितसर स्थापना रानवाटा मंडळाच्या पुढाकाराने झाली आहे, असे डॉ. श्रोत्री यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.

 या क्लब स्थापनेमागील उद्देश आणि सभासदांना मिळणारे फायदे विषद करून गिरीप्रेमी संस्थेचे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सातारा जिल्ह्यातील तरुण पिढीला या क्लबमुळे निश्चितच प्रेरणा मिळेल असे सांगितले. नगराध्यक्ष कदम यांनी या कार्यक्रमासाठी सातारा नगरपालिका मदत करेल असे सांगितले. सभासद झालेले सातारा शहरातील बाळकृष्ण जोशी, डॉ. मिलिंद शहा, डॉ. नावंधर, नीलकंठ पालेकर आदी पंधरा जणांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.             

या कार्यक्रमास डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, डी. व्ही. पाटील, डॉ. निर्मला सुपेकर, डॉ. चारुलता शहा, कराड अर्बन बँकेचे काकडे, वनविभागाचे आडे आदी मान्यवर उपस्थित होते. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रानवाटा मंडळाचे कार्यवाह विशाल देशपांडे यांनी आभार मानले.