शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावचा राजमा दराअभावी पुन्हा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:14 IST

संजय कदम।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : देशाच्या राजधानीत ‘राजमा’ या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत इथला शेतकरी कायम ...

संजय कदम।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : देशाच्या राजधानीत ‘राजमा’ या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत इथला शेतकरी कायम दुष्काळी संकटाचा सामना करत आला आहे. घेवडा पिकासाठी लागणारे पोषक वातावरण या भागात असल्याने हा भाग घेवडा उत्पादनात अग्रणी मानला जातो. तसेच या पिकावर या भागातील अनेक शेतकºयांचे वर्षाचे अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र, या पिकाचा समावेश पीक विम्यात नसल्याने तसेच या पिकास कोणताही हमीभाव नसल्याने या पिकाची दिल्ली दरबारी कायम निराशा राहिली आहे.कोरेगावतील शेतकºयांची दिवाळी राजम्याच्या दर आणि उत्पादनावर अवलंबून असते. मात्र, यंदाचा घेवड्याचा दर पाहिला तर कापूस, कांदा उत्पादन करणाºया शेतकºयांची अवस्था झाली आहे. यापेक्षा बिकट अवस्था घेवडा उत्पादन करणाºया शेतकºयांची झाली आहे.कोरेगावातला घेवडा ‘दिल्ली बाजारी राजमा’ नावाने विकला जात असला तरी परदेशातून केलेल्या आयातीच्या प्रमाणावर घेवड्याचा दर निश्चित होत असतो. गेल्या काही वर्षांत रुपयाचे जागतिक मूल्य कमी झाल्यामुळे आयातीवर प्रतिकूल परिणाम होऊन घेवड्याची आयात कमी झाली. परिणामी घेवड्याचा भाव वधारला होता. यंदा मात्र, पावसाने अगोदरच पाठ फिरविली आहे. पर्यायाने घेवड्याचं उत्पन्न कमी होऊन सुद्धा दर मात्र, गेल्यावर्षीपेक्षा फारच कमी आहेत.टिकाव लागणं अशक्य...शेतकºयांना थेट दिल्लीचा दर मिळावा, म्हणून देऊर येथील एका सामाजिक संस्थेने राजम्याचं पेटंट देखील मिळविलं होतं. पण, प्रचंड भांडवल आणि भांडवलदारांच्या स्पर्धेत कोणाचाच टिकाव लागणं शक्य नाही. त्यामुळे पर्यायाने शेतकरी हतबल होऊन व्यापारी घेईल त्याच दराने घेवडा विकताना दिसत आहे. अशा पद्धतीने संकटांचा सामना करणाºया कोरेगावच्या शेतकºयांपुढे पुढीलवर्षी राजमा करायचा की नाही, हाच एक प्रश्न उभा ठाकला आहे.