शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

खडकाळ माळरानाला लाभली स्ट्रॉबेरीची लाली!

By admin | Updated: December 26, 2014 23:54 IST

घोटेघरला अनोखा प्रयोग : रामदास महाडिकांच्या कष्टाचे चीज

कुडाळ : मुंबईची रोजची धावपळ, दगदग सहन करूनही प्रपंच भागत नव्हता. सूर्योदयापासून सुरू होणारा कष्टाचा प्रवास दिवसाच्या अस्तानंतरही फारसा समाधानकारक ठरत नव्हता. गावाकडे परतावे की मुंबईत राहावे, अशी द्विधा मन:स्थिती होती. अखेर मुंबईतले बिऱ्हाड गावाकडे हलविण्याचा निर्णय घेतला. अन् मेहनतीने खडकाळ रानावर स्ट्रॉबेरी रुजवली. ही कथा आहे, जावळी तालुक्यातील घोटेघर येथील रामदास महाडिक यांच्या कष्टाची. रामदास महाडिक यांचे शिक्षण पाचवीपर्यंतच झाले होते. वडिलोपार्जित शेती अगदीच कमी होती. तीन भावांचा निभाव लागणे कठीण होते. म्हणून त्यांनी उदरनिर्वाहसाठी थेट मध्यप्रदेश गाठले. तेथून मुंबईत आले. मुंबईत दिवसरात्र कष्ट उपसून काही रक्कम जमविली. भरतकामाच्या चार मशीन विकत घेतल्या. भांडूपमध्ये कारागिरांच्या मदतीने भरतकामात जम बसविण्यात सुरुवात केली. अशातच झालेली फसवणूक रोजीरोटीला धक्का आणि मनाला चटका देऊन गेली. तेथून महाडिक आणि पत्नी सुनीता यांच्या वाट्याला पुन्हा काबाडकष्ट आले; परंतु हाती मात्र फारसे लागत नव्हते. त्याची सल मनाला सारखी बोचत होती. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. यातूनच मुंबई सोडली. मेढा-पाचगणी रस्त्यावर काहीशा आतल्या बाजूची ५३ गुंठे खडकाळ जमीन विकत घेतली. तिथे झाडाझुडपांशिवाय काही नव्हते. हार न माणण्याचा स्वभावामुळे ते पुढे सरसावले. सर्व प्रथम ५३ गुंठ्यापैकी काही गुंठ्याचे सपाटीकरण केले. राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख ऐंशी हजारांचे कर्ज घेतले. कूपनलिका घेतली; पण वीज नव्हती. जनरेटर खरेदी केले. ठिबक सिंचन केले आणि स्ट्रॉबेरी रुजविण्याचा संकल्प केला. स्ट्रॉबेरी रुजताना पाहून त्यांचे स्वप्नेही फुलू लागली. शेतासाठी संपूर्ण कुटुंबच एकवटले. स्ट्रॉबेरीला बहर आला. कष्टाचे चीज झाले. त्यांनी ५३ गुंठ्यातील आणखी उर्वरित क्षेत्राचे सपाटीकरण केले. त्यातही स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली. शिल्लक क्षेत्रावरील दगडही आता त्यांनी दूर केले आहेत. ते वर्षाला दीड-दोन लाखांच्या भांडवलातून चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे. स्ट्रॉबेरीची तोडणीस पहाटेच सुरुवात करून सकाळी अकराच्या आत भिलार येथे पाठविली जातात. तिथे एक कंपनी स्ट्रॉबेरी खरेदी करते. सर्वोत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीला १५० रुपये किलोचा भाव मिळत आहे. ‘विंटर’ आणि ‘कॅमारोजा’ जातींच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. (प्रतिनिधी)अस्वस्थतेतून गावाकडे आलो आणि स्ट्रॉबेरीबरोबर मनालाही मातीत रुजवून घेतले. संपूर्ण कुटुंबीय शेतीकडे वळालो असून मुलांना शिक्षण मिळाला लागले आहे.- रामदास महाडिक