शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आपत्तीला भिडणार रबर बोट, फ्लोटिंग पंप

By admin | Updated: June 14, 2015 23:55 IST

नियंत्रण कक्ष सक्रिय : पोलिसांसह गृहरक्षकदलाचे ३६ जवान तैनात

जगदीश कोष्टी, सातारा : पसरणी घाटात दरड कोसळली... केळघर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक वळविली... किंवा कोयना धरणातून पाणी सोडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, अशा बातम्या प्रत्येक पावसाळ्यात प्रसारमाध्यमातून झळकत असतात. नैसर्गिक आपत्ती कोणाला सांगून येत नसते; पण कसलीही आपत्ती आली तरी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सातारा जिल्ह्यात नैसर्गिक असमतोल नेहमीच जाणवत असतो. जिल्ह्यात सर्वच ॠतू चांगले असतात. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, तापोळा, नवजा येथे दररोज सरासरी शंभरहून अधिक मिलीमीटर पाऊस पडत असतात. सातारा, कऱ्हाड, पाटण, खंडाळा, वाई या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे अनेकदा सामान्य जनजीवन विस्कळीत होत असते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा तालुक्यांतून डोंगररांगा गेल्या आहेत. या तालुक्यांत मुसळधार पाऊस पडत असतो. पावसाचे पाणी डोंगरात झिरपल्यामुळे व वाहतुकीमुळे दरडी कोसळण्याचे प्रकार सतत घडत असतात. यामध्ये वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाट, सातारा-महाबळेश्वर मार्गावर केळघर घाट तर महाबळेश्वर-महाड रस्ता तसेच सातारा-ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. पसरणी घाटात गेल्यावर्षी महाकाय दगड रस्त्यावर पडला होता. हा दगड माणसांना हटविणंही शक्य नव्हता. तेव्हा जेसीबीच्या साह्याने दगड फोडून बाजूला करावा लागला होता. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. महाबळेश्वर, तापोळा, नवजा येथे एका-एका दिवसात दीडशे ते दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सहा वक्री दरवाजातून पाणी सोडावे लागते. कोयनानदी दुथडी भरून वाहते तेव्हा काठावरील असंख्य गावांना धोक्याचा इशारा दिला जातो. अनेकवेळा गावे संपर्कहीन होतात. अशावेळी शासनाचा आपत्कालीन विभाग मदतीसाठी धावून येतो. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकतीच आपत्कालीन विभागाची बैठक घेऊन सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका पातळीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. हा विभाग चोवीस तास काम करत राहणार आहे. कोणत्याही गावात नैसर्गिक संकट ओढावल्यास तेथील कर्मचारी किंवा नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा आपत्कालीन विभागाला संपर्क साधून माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर काही तासांतच मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोणत्याही गावात नैसर्गिक संकट आल्याची माहिती मिळाल्याबरोबर सर्वात प्रथम जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देऊन पोलीस पाठविले जातात. त्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी साधनसामुग्रीसह मदतीला जाणार आहेत. यासाठी गृहरक्षक दल व पोलीस यांचा ३६ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाला आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी येईल, असे साहित्य पुरविले आहे. मदतकार्यात स्थानिक तरुण, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जाणार आहे.