शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एक ट्रक वाळूला ३५ हजार रुपये : सातारा जिल्ह्यात वाळू तस्करांकडून राजरोस लुटालूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:59 IST

सातारा : लिलावच थांबल्याने वाळू तस्करांकडून राजरोसपणे लूट सुरू

ठळक मुद्देलिलाव थांबले

सागर गुजर ।सातारा : लिलावच थांबल्याने वाळू तस्करांकडून राजरोसपणे लूट सुरू आहे. एका ब्रासचा दर ५ हजार रुपये तर एक ट्रक वाळूची किंमत तब्बल ३५ हजार रुपये इतकी झाली आहे.

लिलाव झाले नसले तरी चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरूच आहे. नद्या, ओढ्यांतील वाळू राजरोसपणे चोरून ती चढ्या भावाने विक्री केली जात आहे. या वाळू तस्करांना प्रशासनाची भीतीच राहिलेली नाही.जिल्ह्यात नदी पात्रातील वाळूचे लिलाव गेल्या एक वर्षापासून झालेच नाहीत. लिलाव झाले नसले तरी वाळूउपसा थांबलाय, असेही नाही. बांधकामे सुरूच असल्याने वाळूची मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षांत वाळू लिलाव झालेले नाहीत. याचा गैरफायदा वाळू तस्करांनी घेतला आहे.

वाळूचे भाव दुपटीने वाढले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वाळूची गरज असते. वाळूअभावी बांधकाम मध्येच थांबवता येत नाही, त्यामुळे नदीची नाही मिळाली तर ओढ्याचीही वाळू घेतली जात आहे. या वाळूत मातीचे प्रमाण जास्त असले तरी ‘आडला नारायण...’ त्या उक्तीप्रमाणे मिळेल तेवढी वाळू घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमध्ये स्पर्धा दिसून येते.

स्पर्धेचा फायदा वाळू तस्करांनी घेतला आहे. एका डंपिंग ट्रॉलीमध्ये १ ब्रास वाळू बसते. ही एक ब्रास वाळू पूर्वी दोन ते अडीच हजार रुपयांत मिळत होती, एकाच वर्षात हा दर दुपटीने वाढवला गेला आहे. महसूल प्रशासन अधून-मधून दाखवायला कारवाया करत असले तरी वाळू चोरांची मिजास वाढतच चालली आहे. महसूलची यंत्रणाही त्यांना सामील असल्याने वाळू चोरीचे प्रमाणही वाढले आहे.

दरम्यान, महागडी वाढू खरेदी केल्याने घरबांधणीचा खर्चही वाढत असून, घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांच्या खिशाला त्याची झळ बसत आहे. कर्ज काढून घरे बांधणाºयांची भलताच कोंडमारा झाल्याचे जिल्हाभर पाहायला मिळत आहे. हा तोंड दाबून बुक्यांचा मार सोसतच लोक नव्या घराचे स्वप्न पाहताना दिसत आहेत.वाळूच्या टंचाईचा फटका शासकीय कामांना बसत असून, बहुतांशी शासकीय बांधकामे पूर्ण करण्याची मुदत मार्चअखेरपर्यंत आहे. दोन महिन्यांपासून कामे बंद आहेत.ताडपत्रीने झाकून रात्रीची वाहतूकवाळू उपशावर बंदी असली तरी बेकायदा उपसा सुरूच आहे. रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. वाळूवर ताडपत्री झाकून ही वाहतूक होत असते. ग्रामीण भागात तर उघडपणे वाळू वाहतूक होत असली तरी स्थानिक पातळीवर तलाठ्यांना हाताशी धरून वाळू माफियांकडून वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचा आरोप दक्ष नागरिक करत आहेत.काय आहेत निर्बंधराष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातील वाळू उपशावर पूर्णपणे बंदी घातली आहे. १९ एप्रिल २०१७ रोजी निर्बंध घातले गेले आहेत. हा आदेश मिळाल्यानंतर जिल्हा महसूल विभागाने सर्व तहसीलदारांना सक्शन पंपाने वाळूउपसा करण्यावर बंदी घातली गेल्याचे पत्र पाठविले आहे.वाळूला पर्याय ठरतेय ‘ग्रीड’डोंगर फोडून काढलेल्या खडीची जी ग्रीड तयार होती, तिच ग्रीड आता बांधकामासाठी वापरली जात आहे. वाळूची कमतरता असल्याने या ग्रीडचा वापर केला जात आहे. मात्र ग्रीडचा पर्याय बांधकाम करण्यासाठी कितपत योग्य ठरतोय, याबाबत लोकांमध्ये अनेक शंका आहेत.