शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

लूटमार, दरोड्याच्या घटना गुन्हे शाखेकडून उघडकीस

By admin | Updated: June 26, 2014 00:40 IST

साताऱ्यातील दोघांना अटक : लाखोंचा ऐवज जप्त

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने २०१३ मध्ये जिल्ह्यात घडलेले लूटमार व दरोड्याचे तीन गुन्हे उघडकीस आणून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यांच्या प्रकरणात लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पेट्रोलिंग करताना तेजस भारत भांडवलकर (वय १८, रा. कृष्णानगर, सातारा) आणि स्वप्निल हरिश्चंद्र कांबळे (वय २०, रा. संगमनगर, सातारा) यांना अटक केली होती. या दोघांनीही लूटमार केल्याचे कबूल केले होते.दि. २७ नोव्हेंबर २०१३ रोजी सातारा तालुक्यातील शहापूरजवळ मंगेश लक्ष्मण जाधव (वय ४९, रा. करंडी) या व्यापाऱ्याला गाडी आडवी मारून मारहाण करीत डोळ्यात चटणीची पूड टाकण्यात आली होती. यावेळी सोन्याची चेन व २० हजारांची रोकड नेण्यात आली होती. याप्रकरणात तेजस भांडवलकर, स्वप्निल कांबळेचा समावेश होता. करंडी, ता. सातारा येथे नोव्हेंबर २०१३ मध्ये सायंकाळच्या सुमारास पाणी मागण्याचाा बहाणा करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी हिसकावून नेण्यात आले होते. यामध्ये तेजस भांडवलकर, स्वप्निल कांबळे यांच्याबरोबरच हसन मस्जिद शेख (रा. संगमनगर, सातारा) आणि अन्य दोघांचा समावेश होता. जून २०१३ मध्ये सालपे घाटातही ट्रकला दुचाकी आडवी मारून चालकाला मारहाण करून लुटण्यात आले होते. यावेळी २३ हजारांची रोकड नेण्यात आली होती. याप्रकरणी हरेंद्र मोहन सिंग (रा. कळंबोली) यांनी तक्रार दिली होती. या लुटमारीतही तेजस, स्वप्निलबरोबरच फरार असणाऱ्या इतर दोघांचा समावेश होता.पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामराव मदने, हवालदार संजय पवार, प्रवीण फडतरे, नितीन शळके, नितीन भोसले, दीपक मोरे, संजय शिंदे, पृथ्वीराज घोरपडे, संतोष जाधव आदींनी कारवाईत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)