सातारा-कोरेगाव रस्त्यावरील दुभाजकात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. या ठिकाणी चार वर्षांपूर्वी रस्ता झाला असला तरी अजूनही शोभेची झाडे लावली नाहीत. (छाया : जावेद खान)
फोटो २७डिव्हाडर
००००००००००००००
कोरोना वाढू लागला
सातारा : जिल्ह्यातील शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. आता तर कोरोनाने कहर सुरू केला आहे.
---------------------
वीज सतत खंडित
सातारा : सातारा शहरात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. सातारा शहरातील काही भागांतील वीजपुरवठा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दोन ते तीन वेळा खंडित झाला. उन्हामुळे उकाडा वाढला आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो.
--------------------------
सवयभानचा विसर
सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातरकर मास्कचा वापर करीत नाहीत. गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करून दिली जात होती; पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.
-------------------------
रस्त्यावर वाहनतळ
सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.
------------------------------
चौकात पुन्हा गर्दी
सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत असून, एकमेकांना दोष दिले जात आहेत; पण त्याचवेळी दररोज सायंकाळी अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये आइस्क्रीम खाण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
---------------------------जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली
सातारा : मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली आहे. विशेष करून ठेकेदार अधिक संख्येने येत असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिना अखेरपर्यंत आर्थिक कामे उरकण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग युद्धपातळीवर काम करीत आहेत, तसेच सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. त्यातच बिले काढण्यासाठी बांधकामसह इतर विभागांत गर्दी होताना दिसून येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामे करताना अडचणी येत आहेत.
------------------------------सोसायट्यांमध्ये वावर
सातारा : असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तर विचारणा होत नाही; पण काही सोसायटींत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
-----------------------------वसुली पथकाशी वाद
सातारा : ग्रामीण भागात वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून कर्तव्य कसे पार पाडायचे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. नागरिकांनीच बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
-------------------------होळी साधेपणाने साजरी करण्याची गरज
सातारा : कोरोनाचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर होळी, रंगपंचमी, धुळवड साध्या पद्धतीने साजरी करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी करण्याचे टाळून घरातच साध्या पद्धतीने होळी साजरी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
------------------------स्कार्पचा वापर
वडूज : माण, खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्पचा वापर केला जात आहे. यामध्ये शाळा-महाविद्यालयीन तरुणी ड्रेसवर मॅच होतील अशा पद्धतीचे स्कार्प, ट्रोल खरेदी करीत आहेत.
-----------------------
पाणपोईची गरज
दहीवडी : माण तालुक्यात उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
--------------------------दहावीचे विद्यार्थी अभ्यासात मग्न
सातारा : दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे मुलांचा चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू आहे. प्रशासनाचा कशाही पद्धतीने पेपर घेण्याचा निर्णय झाला तरी आपण कमी पडायला नको म्हणून अनेक मुले दुपारच्या वेळी निर्जन ठिकाणी अभ्यासासाठी जात आहेत. यामध्ये शहरातील बागा, मंदिर, डोंगरात जात आहेत, तसेच रात्रीही उशिरापर्यंत जागरण करून ते अभ्यास करतात.
------------------------व्यवसाय कर भरा
सातारा : नोंदणीकृत व्यक्ती, मालकांनी व्यवसायकर ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. त्यामुळे नोंदणीकृत, तसेच नावनोंदित व्यक्ती मालकांनी कर भरणा विहित मुदतीत करून शासनाच्या महसूल वाढीस सहकार्य करावे, असे आवाहन व्यवसाय कर अधिकारी व्ही. व्ही. घोलप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.