शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू खूनप्रकरणी सातारकर रस्त्यावर...नातेवाइकांची चौकशी

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या : पुरावे गोळा करण्यासाठी केली पुन्हा पोलीस कोठडीची मागणी

सातारा : शाहुपरी येथील रिंकू ओसवाल विवाहिता खून प्रकरणात पोलिसांनी सोमवारी रिंकूची आई चंदा, बहीण प्रतिका यांच्याकडे चौकशी करत पोलीस उपनिरीक्षक संतोष पांढरे यांनी त्यांचे जबाब घेतले. रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा खून गळा दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी पती भरत कांतिलाल ओसवाल यास अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आणखी सक्षमपणे करावा, या मागणीसाठी रिंकूच्या नातेवाइकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या : पुरावे गोळा करण्यासाठी केली पुन्हा पोलीस कोठडीची मागणी सातारा : शाहूपुरी येथील विवाहिता रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा खून गळा दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी या खून प्रकरणाचा तपास सक्षमपणे करण्यासाठी आरोपी भरत कांतिलाल ओसवाल याचे फोन कॉल्स, व्हॉट्स अ‍ॅप आदी माहिती, तसेच पुरावे गोळा करण्यासाठी सरकार पक्षाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाने सोमवारी एका मोर्चाद्वारे केली. शाहूपुरी येथील रिंकू भरत ओसवाल (वय २४) हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. रिंकूची आई चंदा यांनीही मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. चंदा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती भरत ओसवाल रिंकूला मानसिक त्रास देण्याबरोबरच जाचहाटही करत होता. मूल होत नसल्यामुळे तो चिडून होता. विवाहप्रसंगी तोंडी बोलणे झाल्याप्रमाणे २२ पैकी सोळा तोळे सोने देण्यात आले होते. यानंतर उर्वरित सोन्यासाठी रिंकूला मानसिक त्रास दिला जात होता. दरम्यान, वैद्यकीय अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, रिंकूचा खून गळा दाबून झाल्याचे नमूद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पती भरत यास अटक केली आणि त्याला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाग्यश्रीच्या खून प्रकरणात आरोपी भरत ओसवाल यास अटक झाली असली तरी त्याचा आवश्यक तो तपास अजून झालेला नाही. तपास चारही बाजूंनी व्हायला हवा. भरत ओसवाल याचे फोन कॉल्स, व्हॉट्स अ‍ॅप याची सर्व माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी सरकार पक्षाने पुन्हा एकदा आरोपीची पोलीस कोठडी मागायला हवी आणि त्या दृष्टीने तपास करायला हवा. याप्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव येता कामा नये. सरकारी वकिलांनी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देता कामा नये. या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या उणिवा राहू नयेत म्हणून पोलिसांना मार्गदर्शन करण्याची मागणीही ‘मलोआ’ने निवेदनात केली आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याबरोबरच खटल्याचे काम लवकर चालावे आणि आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी सरकारी वकील आणि पोलिसांनी संवेदनशीलपणे कामकाज करावे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून या प्रकरणाची सखोलपणे तपासणी करण्याची मागणी केली. डॉ. देशमुख यांनीही त्यांना सक्षमपणे तपासणी करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)कुटुंबाबरोबर संबंध ठेवू नका..!भरत ओसवाल याने गुलमोहर कॉलनीत पत्नी रिंकूचा ज्या प्रकारे खून केला ती घटना निंदनीय आहे. या घटनेचा निषेध म्हणून समाजातील सर्व घटकांतील लोकांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी या कुटुंबाबरोबर कोणताही कौटुंबिक अथवा मैत्रिपूर्ण संबंध ठेवू नये. त्याचबरोबर त्यांना आर्थिक पाठबळ देऊ नका. या प्रकरणात केवळ शाब्दिक निषेध व्यक्त करणे पुरेसे नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कुटुंबांचा निषेध करावा, अशी मागणीही ‘मलोआ’ने निवेदनात केली आहे. प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने होण्यासाठी सातारा येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या वतीने राज्याध्यक्ष वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला मुक्तांगणपासून सुरुवात झाली. येथे भरत ओसवाल याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.‘सातारकर’ म्हणून आम्ही माफी मागतो !रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा खून ही सातारकरांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सातारा शहरात आम्ही तिला सुरक्षितपणे नांदवू शकलो नाही, याची सातारकर म्हणून आम्हाला खंत वाटते. या कुटुंबांची सातारकर म्हणून आम्ही माफी मागतो, असे स्पष्ट करतच मृत्युपश्चात भाग्यश्रीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असल्याचेही महिला लोक आयोगाने यावेळी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.