सातारा : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी जाहीर करण्यात येणार असून, त्याची पूर्वतयारी बैठक सोमवारी झाली. यामध्ये विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याणच्या सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या पूर्वतयारी आढावा बैठकीत अध्यक्षांनी विविध विभागांची माहिती घेतली.
चौकट :
सोशल डिस्टन्समध्ये उद्या सभा...
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी एकला मांडण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतीलच दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ही सभा होणार आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करत ही सभा होणार आहे.
..................................................