शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

खंबाटकी बोगद्यातील वाहतूक पूर्ववत; तीन तासांत धोकादायक खांब हटवले

By दत्ता यादव | Updated: August 19, 2023 15:20 IST

शनिवार, रविवार सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला.

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या खांबाची महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दखल घेऊन तीन तासात चार धोकादाय खांब हटवले. शनिवार, रविवार सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला.

खंबाटकी बोगद्यामध्ये काही वर्षांपूर्वी विद्युत सुविधेसाठी हे खांब वरच्या बाजूला लावण्यात आले होते. मात्र, यातील  काही खांब खराब झाले होते.  सलग दोन दिवस वाहनांवर हे खांब कोसळत होते. मात्र, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. कारचे मात्र, नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तसेच भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गरजे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, कृष्णकांत निंबाळकर, हवालदार डेरे, संतोष लेंभे या पोलिस कर्मचाऱ्यांसह पीएस टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग प्रशासनातील अधिकारी संकेत गांधी, त्यांचे कर्मचारी तसेच महामार्ग पेट्रोलिंगच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली.

मोठ्या क्रेनच्या साह्याने सलग तीन तास सर्वांनी काम करून  बोगद्यातील धोकादायक खंबांची पाहणी करून त्यातील चार खांब तातडीने हटवण्यात आले.  तसेच बोगद्यात वरच्या बाजूला असलेल्या इतर खांबांची स्थिती कशी आहे, याची पाहणीही महामार्ग प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. सलग सुट्यांमुळे वाहतूक वाढली आहे.

वाहनचालकांनी काळजी करू नये...सध्या या बोगद्यामध्ये धोकादायक स्थितीत असलेले खांब काढण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित खांबदेखील लवकरच काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खंबाटकी बोगद्यामध्ये सलग दोन दिवस वाहनांवरती लोखंडी खांब पडत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु आता हे धोकादायक खांब हटविल्यामुळे वाहनचालकांनी काहीही काळजी करू नये, असे आवाहन पीएस टोलरोड कंपनीचे अमित भाटिया यांनी केले आहे.  

टॅग्स :satara-pcसातारा