वाठार स्टेशन : तळिये, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांना वाठार पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांची तक्रार ऐकुन घेण्यापुर्वी त्यांना अपमानास्पद वागणुक दिली जाते. तसेच अपशब्द वापरत त्यांना पोलीस ठाण्याबाहेर जाण्यास भाग पाडल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करीत गावची तंटामुक्ती समिती हद्दपार करन्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.या बाबत अधिक माहिती अशी तळिये गावातील दिपक कालिदास काकडे हा युवक गावचा रहिवासी नसताना त्याकडे गावचा रहिवासी असल्याचा कोणताही पुरावा नसताना तो गावामध्ये दहशत पसरवणे,गटतट निर्माण करणे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे, तसेच तंटामुक्ती अध्यक्षांना जमा-खर्च मागने,महिला सरपंचावर दबाब तंत्राचा वापर करने,ग्रामसेवकांना धमकावणे या बाबतची तक्रार घेवुन वाठार पोलीस ठाण्यात गेलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष,सरपंच पदाधिकारी यांना पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांची बैठक व्यवस्था हिसकावुन घेत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी पोलिस ठाण्यातुन बाहेरचा मार्ग दाखवल्याने अशा मस्तवाल अधिकारयाविरोधात या पुढे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करायचे नसल्याबाबत चा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला या ठरावास सुचक म्हणुन रामचंद्र गोपाळ चव्हान तर माजी जि.प सदस्य ज्ञानदेव तुकाराम लोखंडे यांनी अनुमोदन दिले आहे.वाठार पोलिसांच्या आदेशाप्रमाणे गावाने डॉल्बी बंदी तसेच तंटामुक्ती कमेटी व अध्यक्ष निवडीचा ठराव करावा अशी मागणी वाठार पोलिसठाण्याकडुन आल्यानंतर गावातील असलेली तंटामुक्ती कमेटी व अध्यक्ष निवडी करु नये असाच सुर ग्रामस्थांनी काढत हा ठराव केला या ठरावावर सरपंच ,उप सरपंच यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर) वाठार पोलीस ठाण्याच्या सिंघमवर कारवाई होणार का?वाठार पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच या भागातील अवैध व्यावसायकांच्या मुस्क्या आवळलेल्या वाठार पोलिस ठाण्याच्या या सिंघम बाबत वरिष्ठाकडुन कोणती कारवाई होणार या बाबत आता चर्चा सुरु आहे.
तंटामुक्ती समितीच्या हद्दपारीचा ठराव
By admin | Updated: August 18, 2015 22:20 IST