शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणामुळे दिग्गजांची धावपळ...!

By admin | Updated: December 23, 2016 23:06 IST

पोळ गटाचा प्रभाव : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याने प्रतिष्ठा लागणार पणाला

सचिन मंगरुळे ल्ल म्हसवडराजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्डी जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांचा उमेदवारीचा या गटातील पत्ता कट झाल्याने त्यांना उमेदवारीसाठी इतर गटांचा आसरा घ्यावा लागणार आहे. तर माजी सभापती श्रीराम पाटील यांच्याही वरकुटे-म्हसवड गणात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने त्यांनाही इतरत्र उमेदवारी करावी लागणार आहे. मार्डी जिल्हा परिषद गट दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्यांचा होम ग्राऊंड असल्याने या गटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ असली तरी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद या गटात वाढल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसनेही कंबर कसली आहे.मार्डी जिल्हा परिषद गटात गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे निवडून आले होते. परंतु या गटातील आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक कोणत्या गटातून ते करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर जिल्हा परिषद मार्डी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या घरातील महिलेस उमेदवारीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर काँग्रेस कडून विद्यमान पंचायत समिती सदस्या शिला पोळ यांना बढती मिळण्याची शक्यता असून, त्यांना या गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष रिंगणात उतरवू शकते तर विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या पत्नीला वरकुटे-म्हसवड गणात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर या गणात ‘रासप’चे नेते बबनदादा वीरकर यांच्या घरातील महिलेला उमेदवारीसाठी नावाची चर्चा आहे. तर मार्डी गणात मागासवर्गीय पुरुष आरक्षण जाहीर झाल्याने राष्ट्रवादी कडून रमेश पाटोळे व नितीन सावंत इच्छुक असल्याची चर्चा असली तरी काँग्रेसकडील इच्छुकांची नावे गुलदस्त्यात आहेत.मार्डी गटातील प्रमुख गावांतील मोठ्या मतदार संख्या असलेल्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची सत्ता असून, या गटातील अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारांची सत्ता असल्याने या निवडणुकीत गटात व गणात काटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हसवड पालिकेत आमदार गोरेंना पालिकेच्या सत्तेतून पायउतार करण्यासाठी आमदार गोरे यांचे सर्व विरोधक एकत्रित येत शेखरभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवून पालिकेच्या सत्तेत परिवर्तन घडवल्याने आमदार विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीत हाच म्हसवड पॅटर्न आमदार गोरेंचे विरोधक राबविणार का? सर्व विरोधक वेगवेगळे लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मार्डी गटात शिवसेना स्वतंत्र लढणार का? या गटात शिवसेनेचे रंगकामगार सेनेचे अध्यक्ष विश्वासराव साळुंखे, रंगकामगार ठेकेदार सेनेचे कार्याध्यक्ष धनाजी सावंत, माण तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांचे होम पिच असल्याने या गटात सेना पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्र लढणार की महायुतीच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसला टक्कर देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत गोरे बंधूंचा हाय व्होल्टेज झटकासद्य:स्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, महायुतीतील घटक पक्ष एकत्रित येत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील, असा अंदाज राजकीय जानकारांकडून वर्तवला जात असला तरी अंतिम चित्र स्पष्ट होई पर्यंत तिरंगी ऐवजी बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या तीन वर्षांत माण तालुक्यातील कोणतीही निवडणूक असूद्या त्या निवडणुका आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे समर्थकांमध्ये झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही या दोन्ही बंधंूतच लढली जाणार असल्याने हाय व्होल्टेज निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.