शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा अन् धनगर समाजाला आरक्षण द्या : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:55 IST

सातारा : ‘गेल्या साडेतीन वर्षांपासून सध्याचे सरकार केवळ सवंग लोकप्रियतेसाठी फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे. कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाही. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात चालढकल केली जात आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा भरल्या जात नाहीत. वृद्धापकाळात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात वाढ केली जात नाही. सरकारने घोषणा करण्यापेक्षा अंमलबजावणी करावी, ...

ठळक मुद्देघोषणेपेक्षा अंमलबजावणी करण्याची पावसाळी अधिवेशनात मागणी

सातारा : ‘गेल्या साडेतीन वर्षांपासून सध्याचे सरकार केवळ सवंग लोकप्रियतेसाठी फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे. कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाही. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात चालढकल केली जात आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागा भरल्या जात नाहीत. वृद्धापकाळात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात वाढ केली जात नाही. सरकारने घोषणा करण्यापेक्षा अंमलबजावणी करावी, अन्यथा जनता तुम्हाला विरोधी बाकावर बसवेल,’ असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.

नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांविषयी विधिमंडळ सभागृहात ते बोलत होते. आमदार गोरे सभागृहात बोलताना पुढे म्हणाले, ‘सरकार आल्यावर १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाºयांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून त्याबाबतीत काहीच केले नाही. आरक्षण देण्याविषयी नेमलेली समिती दीड वर्षात अहवाल देणार होती. मात्र, साडेतीन वर्षे झाली तरी काहीच निर्णय घेण्यात आला नाही. धनगर समाजाने केलेल्या आंदोलनामुळे आरक्षण मिळाले नाही. मात्र, दोन मंत्रिपदे मिळाली.

धनगर समाजाला आरक्षण लवकर मिळावे, अन्यथा हाच समाज तुम्हाला विरोधी बाकावर बसवेल,’ असा इशाराही आमदार गोरे यांनी दिला.आमदार गोरे म्हणाले, ‘इतिहासात कधीच निघाले नव्हते असे विराट मोर्चे निघाले, लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. मात्र आश्वासनाशिवाय या सरकारने काहीच दिले नाही. हे सरकार निर्दयी आहे. मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घेतलेली भूमिका चुकीची होती, असे सांगताना या सरकारने काय केले ते जनतेसमोर आले पाहिजे.’

गोरे म्हणाले, ‘या सरकारकडे राज्याच्या बजेटचे नियोजन नाही. सगळी अनागोंदी सुरू आहे. गेल्या साडेतीन वर्षांत या सरकारने दीड लाख कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या आहेत. राज्याच्या कर्जाचा बोजा पाच लाख कोटींवर गेला आहे.’सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस...गेल्या साडेतीन वर्षांपासून हे सरकार फक्त घोषणाच करत आहे. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन वाढविण्याविषयी अनेक वेळा आवाज उठवला. मंत्र्यांनी त्याविषयी घोषणा केल्या. मात्र आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सरकारने या योजनांद्वारे राज्यातील वृद्धांना दिलासा द्यावा, असेही आमदार गोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण