शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनातून अनेक माहिती उजेडात--महादेवाच्या डोंगररांगातही आढळल्या १४६४ वनस्पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:55 IST

निसर्गाकडून मिळालेले वरदान जपणे आपलेच काम आहे. विकास करण्यासाठी पर्यावरणाची हानी करणे हा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांना पर्यावरणपूरक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, वनस्पती अभ्यासक

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

जगदीश कोष्टी।सातारा : पश्चिम घाटात जैवविवधता विपुल प्रमाणात आढळते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याचप्रमाणे शंभू महादेवाच्या डोंगररांगांमध्ये आढळतात हे फारसे कोणाला माहीतच नाही. औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुहन मोहोळकर यांनी नऊ वर्षे अभ्यास करून पीएचडी मिळवली. या यातील काही डोंगरांचा अभ्यास केला. त्यामुळे अनेक धक्कादायक माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद...

  • प्रश्न : याच विषयाची निवड का केली?

उत्तर : माधव गाडगीळ समितीच्या अहवालात पश्चिम घाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगांचा हरित पट्ट्यात समावेश केला आहे. पण असंख्य वनस्पती अभ्यासकांनी महाबळेश्वर, कास, वासोटा, पाटण या पश्चिम घाटातील डोंगरांवर लक्ष केंद्रित केले आहे. शंभू महादेवाच्या डोंगररागांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवल्याने हा विषय निवडला.

  • प्रश्न : किती वनस्पतींचा अभ्यास केला?

उत्तर : महादेवाच्या डोंगररांगातील खंबाटकी, चंदनवंदन, हरहरेश्वर, सोळशी, चवणेश्वर, जरंडेश्वर, कल्याणगड, रामेश्वर, कार्तीक स्वामी, शामगाव, चौरंगीनाथ, सागरेश्वर, पाटेश्वर यांचा अभ्यास केला. या डोंगररांगांत १४६४ वनस्पती आढळून येतात. त्या १२० कुळातील असून, ११८ प्रकारच्या आहेत. त्यातील तेरा प्रकारच्या झाडांचा ‘रेन डाटा बुक’मध्ये समावेश झाला आहे.

  • प्रश्न : वेगळेपण काय आढळले का?

उत्तर : ईरिनोकारपस, शेशाग्रिया, ट्रायलोबॅक्नी, ब्रेची स्टेलमा, ड्रीमिया कंजेस्टा, निलांबरी, फ्रेरिया, हिटेरोस्टेमा कंजेसटा, हिटेरोस्टेम उर्सिओ लॅटसी हे झुडूपवर्गीय वनस्पती आढळले. ते इतरत्र कोठे आढळत नाहीत. पश्चिम घाटात आढळणाऱ्यांपैकी सुमारे १९८ प्रकारच्या वनस्पतीही या डोंगररांगांमध्ये आढळत आहेत. 

दुर्मीळ वनस्पती संपण्याच्या मार्गावरविकासाच्या नावाखाली डोंगरावर पवनचक्क्या, सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातात. महामार्गासाठी डोंगर पोखरले जातात. यामुळे दुर्मीळ वनस्पतींवर घाला येतो. पर्यटकांच्या गाड्यांसाठी मोठी जागा सोडली जाते. त्यामुळे वनस्पती वाढीला अडथळे येत आहेत. त्यामुळे शासनाने अशा डोंगररांगांमधील जैवविविधता जपण्यासाठी कसल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

वनस्पतींना धोकाअनेकदा गुºहाखी, पर्यटकांकडून डोंगरांना वणवे लावले जातात. त्यामध्ये मौल्यवान औषधी वनस्पती, कंद वर्गीय ड्रिमिया कंटेस्ता ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तसेच माती धरून ठेवणारे गवतच जळत असल्याने धोका वाढला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforestजंगल