शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

satara news: वाघदरा डोंगर परिसरात बिबट्याचे वास्तव्य, वनविभागाची ड्रोनद्वारे पाहणी; ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना

By प्रमोद सुकरे | Updated: January 7, 2023 18:15 IST

पहिल्यांदाच ड्रोनद्वारे रेस्क्यू ऑपरेशन 

प्रमोद सुकरेजिंती (ता. कराड) गावच्या वाघदरा डोंगर परिसरात वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. यामध्ये दोन बिबटे आढळून आले असून ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.जिंती येथे वाघदरा शिवारात गेली तिन ते चार दिवस झाले दिवसा बिबट्या  ओरडण्याचा आवाज येत होता. वारंवार लोकांना प्रत्यक्ष दिसतही होता. या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी रोजी वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी ड्रोन व्दारे या परिसराची पाहणी केली. बिबट्या ओरडण्याचा आवाज वारंवार येत असल्याने तो जखमी आहे किंवा अडकला असण्याची शक्यता होती.

मात्र ड्रोन पाहणीत नर व मादी जातीचे बिबटे असून प्रजनन काळ असल्याने ते एकत्र आले आहेत. आणखी काही दिवस ते एकत्र राहतील. या कालावधीत या परिसरात लोकांनी जाणे टाळावे. अशी माहिती कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी दिली. उपवसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनंरक्षक महेश झांजूर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल कोळे, बाबुराव कदम वनरक्षक सचिन खंडागळे, सुभाष गुरव, वनसेवक सतिश पाटील व पुणे येथील रेस्क्यु टिमचे कर्मचारी यांनी एकत्रित रेस्क्यू ची मोहीम राबवली. प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या सुचना ग्रामस्थांना केल्या. त्यावेळी पोलीस पाटील संतोष पाटील,  पै. सुशांत पाटील , सदस्य मेहुल आंबवडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.पहिल्यांदाच ड्रोनद्वारे रेस्क्यू ऑपरेशन जिंती येथे कोणत्या प्रकारच्या प्राण्याचा आवाज येतोय हे पाहण्यासाठी सुरुवातीला साध्या ड्रोन च्या मार्फत शोध घेण्यात आला. मात्र गवत मोठे असल्याने त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले त्यांनी थर्मल सेंन्सर ड्रोन मधून शोध घेतला असता नर व मादी एकत्र फिरत असताना दिसून आले. अशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन कराड तालुक्यात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.

जिंती येथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये नर व मादी बिबट्या आढळून आले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर हा प्रजनन काळ असतो. जिंती मधील बिसटे प्रजनन काळ असल्याने अजून चार ते पाच दिवस एकत्र राहू शकतात. त्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. त्या परिसरात जाणे टाळावे - तुषार नवले 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग