पालिकेच्या मुख्य कार्यालयात नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक प्रशांत चांदे, किशोर येडगे, सागर जाधव, गणेश चव्हाण, नगरसेविका आनंदी शिंदे, अलका जगदाळे, नंदा भोसले, मुख्याधिकारी किरण डाके, मंडळाधिकारी पंडित पाटील, तलाठी सचिन निकम उपस्थित होते. मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेत प्रशांत चव्हाण व कृषी अधिकारी सुहास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कापीलचे उद्योजक भाऊसाहेब जाधव, संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, संजय थोरात, संचालिका डॉ. स्वाती थोरात, डॉ. सारिका गावडे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींनी परेडचे सादरीकरण केले.
रोटरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव विलासराव पाटील यांची उपस्थिती होती. काले फाटा व कोयना वसाहत येथील बचपन प्ले हाऊस व अकॅडमिक हाईट्समध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक सी. बी. जाधव उपस्थित होते.
हौसाई कन्या शाळा शास्त्रीनगर, आगाशिवनगर येथील लक्ष्मीदेवी शिक्षण मंडळाच्या नूतन मराठी विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर व आदर्श प्राथमिक शाळा आगाशिवनगर यासह शहरातील विविध संस्था, २१ अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या सर्व ११ शाळांमधून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.