शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकर यांच्या सहभागाबाबत अहवाल द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 17:13 IST

शाकीर तांबोळींनी दाखल केली याचिका

सातारा : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घडलेल्या हत्याकांडात विक्रम पावसकर यांचा असणारा सहभाग स्पष्ट करण्याकरिता सरकारी वकील एच. एस. वेणेगावकर यांनी कलम १७४ (८) या अनुषंगाने पुढील तपास करून मा. उच्च न्यायालयात सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या बेंचने दिले आहेत. सातारा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात इस्लामपूरचे राष्ट्रीय काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी केलेल्या याचिकेवर हा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रामुख्याने खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जाती-जातींमध्ये तणाव निर्माण होईल व मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण अशी भाषणे केली होती. त्याविरोधात शाकीर तांबोळी, तसेच विविध संघटना, कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा पोलिस प्रशासनास विक्रम पावसकर यांच्याविरोधात वेळोवेळी गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदने दिली होती.औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेसावळी येथील मुस्लीम युवकाचा खून, तसेच पुसेसावळी येथील सार्वजनिक व खासगी मालमत्तेची जाळपोळ व नुकसान याविरोधात औंध पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड संहिता कलम १५३, २९५ अ अन्वये गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. गुन्हे दाखल झाले. परंतु, राजकीय दबावामुळे पोलिस पुढील कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते व त्याकरिता शासन मंजुरीची आवश्यकता असल्याने विक्रम पावसकर यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. त्यामुळेच शाकीर इसालाल तांबोळी यांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली होती.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घडलेल्या हत्याकांडात विक्रम पावसकर यांचा असणारा सहभाग स्पष्ट करण्याकरिता सरकारी वकील एच. एस. वेणेगावकर यांनी कलम १७४(८)च्या अनुषंगाने पुढील तपास करून सहा आठवड्यांत मा. उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात इस्लामपूरचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शाकीर तांबोळी यांनी याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात शाकीर तांबोळी म्हणाले की, पुसेसावळी येथे घडलेल्या हत्याकांडाचा तपास हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली एकतर्फी झाला असून, यामध्ये गुन्हेगार मोकाट सुटले आहेत व पुराव्यांशीसुद्धा छेडछाड झाली आहे. त्यामध्ये सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्याकरिताच उच्च न्यायालयामध्ये या हत्याकांडाच्या फेरतपासासाठी एसआयटी लावण्याची मागणी करीत आहोत.

सांगली जिल्ह्यातील विटा व इस्लामपूर पोलिस ठाण्यामध्ये दोन्हीही दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र तयार असून पुढील कारवाई शासन मंजुरीसाठी प्रलंबित आहे, असे सांगली पोलिसांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. त्याच अनुषंगाने पुढील कारवाईकरिता सरकारी वकील एच. एस. वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयास चार आठवड्यांची मुदतीची विनंती मागणी केली असता, उच्च न्यायालय यांनी ती मान्य करून चार आठवड्यांमध्ये शासन मंजुरी घेऊन न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.विक्रम पावसकर यांच्या हस्तक्षेप अर्जाच्या अनुषंगाने ॲड. डॉ. अभिनव चंद्रचूड व यशोधन देशमुख हे बाजू मांडत आहेत, तर शाकीर इसालाल तांबोळी यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मिहीर देसाई आणि संस्कृती याज्ञिक या काम पाहत आहेत. सरकारच्या वतीने एच. एस. वेणेगावकर व सहायक सरकारी वकील पी. पी. शिंदे या काम पाहत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHigh Courtउच्च न्यायालय