शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Bird Flu : मरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:28 IST

Bird Flu satara- खटाव तालुक्यातील कटगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी वगळता सर्व ठिकाणचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांत दिलासा मिळाला आहे. आता मृत कावळ्यांच्याच अहवालाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देमरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह...कटगुणचाही प्राप्त, पोल्ट्रीधारकांना दिलासा; कावळ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षाच

सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी वगळता सर्व ठिकाणचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांत दिलासा मिळाला आहे. आता मृत कावळ्यांच्याच अहवालाची प्रतीक्षा आहे.बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.

कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये शनिवारी आणि रविवारी काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर वणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.कटगुणमधील मृत कोंबड्यांचे नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. या अहवालानुसार कटगुणमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मंगळवारी आलेल्या अहवालानुसार कुडाळमधील मृत कोंबड्यांचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पशूपालकांतील भीती कमी होण्यास मदत झाली आहे.मृत कोंबड्यांची नोंद नाही...जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील आठ दिवसांपासून या अहवालांची प्रतीक्षा आहे. तर मागील तीन दिवसांत जिल्ह्यात कोठेही मृत कोंबड्यांची नोंद झालेली नाही. त्यामुळे पोल्ट्रीधारकांतील भीतीचे वातावरण कमी झालेले आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूSatara areaसातारा परिसर