शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

साताऱ्यातील संग्रहालयात विसावले इतिहासाचे ‘साक्षीदार’!; दिल्लीवरून १२ किल्ल्यांची प्रतिकृती दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:01 IST

सातारा : ‘युनोस्को’ला सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक बारा गड -किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाल्या आहेत. ...

सातारा : ‘युनोस्को’ला सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक बारा गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाल्या आहेत. या बारा किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ तर तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. संग्रहालयातील स्वतंत्र दालनात लवकरच या प्रतिकृती नागरिकांना पाहता येतील, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्यांपासून गड-किल्ल्यांपर्यंतचा भौगोलिक वारसा मिळाला आहे. या भौगोलिक वारशाने पर्यटनासाठी एक समृद्ध दालन खुले केले आहे. हे पर्यटन अधिक बहरावे, यासाठी राज्यातील काही शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, याकरिता प्रयत्न सुरू होते. युनेस्कोचे ४६ वे अधिवेशन २१ ते ३१ जुलैदरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानात भरवले गेले. या प्रदर्शनासाठी अखिल महाराष्ट्र गीर्यारोहण महासंघाच्या १५ जणांच्या चमूने किल्ल्यांच्या प्रमाणित प्रतिकृती तयार करून त्या शासनाच्यावतीने युनेस्कोसमोर सादर केल्या.

यामध्ये किल्ले रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतीचा समावेश होता. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर रमेश बलुरगी सांगली (हरिपूर) यांनी या सर्व किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे. दिल्लीतील या प्रदर्शनानंतर या प्रतिकृतींचे संवर्धन करण्यासाठी शासनाने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची निवड केली. मंगळवारी सकाळी दिल्लीवरून विशेष कंटेनरमधून या प्रतिकृती साताऱ्यात दाखल झाल्या. या प्रतिकृती सध्या बंदिस्त असून, लवकरच त्या पाहण्यासाठी खुल्या केल्या जाणार आहेत.

ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण..किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना प्रथमतः ड्रोनच्या मदतीने मूळ किल्ल्यांचे चित्रीकरण व मोजमाप करून या प्रतिकृतींचे प्रमाण आणि आकार ठरवण्यात आले. सात ते दहा फूट आकाराच्या या प्रतिकृती, सनबोर्ड, कागद, फेव्हिकॉल, पुट्टी, रंग आदींचा वापर करून प्लायवूडवर बसवण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतीनंतर चाके लावलेल्या लोखंडी फ्रेमवरून त्या वाहून नेता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

किल्ल्यांच्या या प्रतिकृतींसाठी संग्रहालयात स्वतंत्र दालन तयार केले जाणार आहे. शस्त्र प्रदर्शनाप्रमाणे या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीदेखील नागरिकांना लवकरच पाहण्यासाठी खुल्या केल्या जातील. पुरातत्त्व विभागाकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगडdelhiदिल्ली