शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिके भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 14:15 IST

सातारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

ठळक मुद्दे दुष्काळी तालुक्यांसह बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे नुकसानभात पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील

सातारा,11  : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाळा संपत आला तरी मान्सूनने पाठ फिरवली होती. पाऊस पडण्याची आशा धुसर झाली असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून दुष्काळी तालुक्यांसह बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. खटाव व फलटण तालुक्याला गेल्या पाच दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

या पावसामुळे ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. दुष्काळी तालुक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हातातोंडाशी आलेली बाजरी, सोयबीन, ऊस या पिकांचे शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले. तर वाई तालुक्यात भात पिकाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. भात पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.