मसूर : पुनर्वसित केंजळ-कवठे ते जोतिर्लिंग विद्यालय कवठे या कवठे-मसूर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित विभागाने पाहणी करून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते उदय यादव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
या रस्त्याची गेली कित्येक वर्षे डागडुजी करण्यात आली नसल्याने, या रस्त्यावर मोजता येणार नाहीत, इतके खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची अशी वाईट अवस्था असेल, तर पावसाळ्यात वाहनधारकांना यापेक्षाही बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पुनर्वसित गावांना शासन सर्व सोईसुविधा देत आहे, मग केंजळ गावासाठीच शासन दुजाभाव का करत आहे, तरी संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून तातडीने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने उदय यादव यांनी केली आहे.
फोटो :