शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसातही, पुस्तकांच्या गावात रंगले ‘विंदाचे स्मरण!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 19:48 IST

गंभीर परिसंवाद, बहारदार कविसंमेलन आणि दर्जेदार अभिवाचन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, आज पुस्तकांच्या गावी (भिलार येथे) मुसळधार पावसातही ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम संपन्न झाला

भिलार (सातारा) दि.16 -  गंभीर परिसंवाद, बहारदार कविसंमेलन आणि दर्जेदार अभिवाचन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, आज पुस्तकांच्या गावी (भिलार येथे) मुसळधार पावसातही ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम जणू विंदा करंदीकरांच्या साहित्याचे एकदिवसीय संमेलन होते. या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या अरुणाताई ढेरे आणि स्वागताध्यक्ष होते समस्त भिलारवासी.‘स्मरण विंदांचे’ या पुस्तकांच्या गावी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन विंदांच्या कन्या जयश्री काळे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटन सत्रात  बाळासाहेब भिलारे यांनी भिलारवासीयांच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अरुणा ढेरे यांनी कार्यक्रमामागची भूमिका मांडली. श्रीमती जयश्रीताईंनी विंदांच्या आठवणी उलगडून सांगितल्या आणि शासनाच्या माध्यमातून हे समर्पक ‘विंदा-स्मरण’ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जयश्रीताईंनी नुकतेच प्रकाशित झालेले विंदांचे बालकविता संग्रह पुस्तकांच्या गावाला सस्नेह भेट दिले. विंदांच्या ‘दातृत्व’ भावाबद्दल विशेष विशेष आठवणी त्यांनी सांगितल्या. उद्घाटन सत्रात राज्याचे मराठी भाषा मंत्री  विनोद तावडे यांनी दृक्श्राव्य संदेशाद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि विंदांना अभिवादन केले. तसेच विंदा करंदीकर यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या चित्रफीतीही या प्रसंगी दाखवण्यात आल्या. यावेळी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे उपस्थित होत्या.कविवर्य विंदांच्या वैश्विक भानाचा परामर्श परिसंवादाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभ्यासकांनी घेतला. सांगलीचे डॉ. अविनाश सप्रे, कोल्हापूरचे डॉ. रणधीर शिंदे, बेळगावच्या डॉ. शोभा नाईक आणि पुण्याच्या डॉ. वंदना बोकील यांनी विंदांच्या कवितेच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंवर आपले सधन विचार उपस्थितांसमोर मांडले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवींनी आपल्या काव्यप्रतिभेचे उत्तम सादरीकरण केले. प्रदीप निफाडकर, वृषाली किन्हाळकर, उषा परब, संगीता बर्वे, पवन नालट, ऐश्वर्य पाटेकर, आबा पाटील, श्रीधर नांदेडकर, इत्यादी कवींनी उपस्थितांची मनं जिंकली. कविसंमेलनात सर्व श्रोत्यांना विंदांचे सार्थ स्मरण झाले. बहुतत्ववादी, नित्यनूतनेचा शोध घेणारे विंदा, विश्वभान साधणारी प्रतिभा असणारे विंदा, विज्ञानानिष्ठ विंदा अशा अनेक प्रकारे विंदा रसिकांना उलगडले.शेवटच्या सत्रात अभिराम भडकमकर, सौरभ गोखले, अतुल आगलावे आणि प्रमिती नरके यांनी अभिवाचनातून विंदा करंदीकर यांचे स्मरण साधले. या कार्यक्रमात सातारा व पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि भिलार परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.