शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याच्या मैदानात विधानसभेचा ‘रिमेक’

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

निवडणुकीचा बिगुल वाजला : बिनविरोधची हॅट्ट्रिक की दुरंगी-तिरंगी लढत ?

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. बुधवार (दि. ११) पासूून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. तर १७ मार्चला मतदान होणार आहे. मात्र, या निवडणुकीत गत दोन बिनविरोध निवडणुकींचा कित्ता गिरवून त्याची हॅट्ट्रिक साधली जाणार, की विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिरंगी लढती होणार, याबाबत सध्या कार्यक्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पासून आमदार बाळासाहेब पाटील या कुटुंबाचीच सत्ता कायम राहिली आहे. कारखान्याच्या निवडणुका झाल्या खऱ्या; पण विरोधकांना कधीच त्यात यश मात्र आले नाही. यापूर्वीच्या गत दोन निवडणुका तर लागल्या; कधी अन् बिनविरोध झाल्या, कधी हे कोणाला कळालेही नाही. त्यात बाळासाहेबांच्या संयमी नेतृत्वाचे कसब लागले एवढे खरे! कारखान्याच्या एकूण सभासदांची संख्या ३५ हजार ७८७ आहे. हे सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कऱ्हाड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर व अन्य एका अशा सहा गटांतून १७ उमेदवार निवडले जाणार आहेत. तर दोन शेतकरी महिलांना संचालक होण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती यामधून प्रत्येकी एक उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने या चार दिवसांत बऱ्याच राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी ‘उत्तरे’तून विजयाची हॅट्ट्रिक मारत विरोधकांना चोख ‘उत्तर’ दिले. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या बिनविरोध निवडणुकीची हॅट्ट्रिक बाळासाहेब मारतील का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. मात्र उत्तरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील कदम अन् स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी बाळासाहेबांच्या विरोधात तापवलेले रान अजून पूर्णपणे शांत झालेले दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही नेते कारखाना निवडणुकीत शांत बसतील, असे सध्या तरी वाटत नाही. भविष्यातील राजकारणाचा वेध घेण्यासाठी विरोधी पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले, तर सह्याद्रीच्या सभासद मतदाराला प्रदीर्घ कालावधीनंतर किंमत येणार हे खरे ! एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू ‘सह्याद्री’त सत्ताधारी गटाच्या विरोधात सक्षम दुसरे एकच पॅनेल उभे राहावे, यासाठी दक्षिणसह उत्तरेतील काही नेते छुपे प्रयत्न करीत आहेत. येत्या दोन दिवसांत यांची एकत्रित बैठक सातारा तालुक्यातील ‘एका गावात’ होणार असल्याची माहिती मिळत असून, त्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा वातावरण तापायला लागले आहे.सह्याद्रीच्या कारभाराबाबत शेतकरी सभासदांच्यात असंतोष आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही काही अंशी दिसून आले. होऊ घातलेल्या कारखाना निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करू. - मनोज घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कऱ्हाड उत्तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गलथान कारभाराबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. गतवेळच्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले; मात्र त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे कारखाना निवडणुकीत सभासद शेतकऱ्यांचे पॅनेल रिंगणात उतरवणार आहे. - धैर्यशील कदम, कऱ्हाड उत्तर काँग्रेस सह्याद्रीचारणसंग्राम