शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

मलकापूरातील लाहोटीनगरात बिबट्याचा भरवस्तीत लपंडाव; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2024 12:39 IST

चारी बाजूने इमारती मध्येच शाळुच्या राणात धूम, सकाळी सात वाजता उघड्या राणात बिनधास्त संचार

लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूरः येथील लाहोटीनगर परिसरात मुक्काम ठोकला आहे. या परिसरात बिबट्याचा भरवस्तीत लपंडावच सुर् आहे. चारी बाजूने इमारती असून मध्येच शाळुच्या राणात इकडू- तिकडे धूम ठोकत सकाळी सात वाजता उघड्या राणात बिनधास्त संचार करत असल्याचे दर्शन झाले. शहरी भागात बिबाट्याचा उघड वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा पाळीव प्राणी बिबट्याने ठार केले आहेत. गेल्या कांही वर्षात चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या आनेकवेळा ठार केल्या. रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समिकरणच झाले आहे. आगाशिव डोंगरालगत कांही शेतकऱ्यांना या बिबट्याच्या कळपाचे दर्शन झाले होते. आसपासच्या गावात वारंवार घडलेल्या घटना व जखिणवाडीत विहिरीत पडलेले दोन बिबट्याचे बछडे, त्याच पध्दतीने गेली कांही दिवसांपूर्वी येथोलच समर्थनगर येथे सुरेश गणपतराव इंगवले यांच्या ऊसाच्या शेतात दोन बछडे आणि एक मादी बिबट्याचे वारंवार दर्शन झाले होते. दुसऱ्याच दिवशी घराजवळच पाळीव श्वानवर हल्ला केला. नागरिकांनी आरडा ओरडा केल्यावर बिबट्याच्या कळपाने ऊसत धूम ठोकली. त्यावेळी तिसऱ्या दिवशी रात्री तर मोकळ्या रानातच फिरताना बिबट्याचे दर्शन झाले होते.

नागरिकांनी धुडकाऊन लावल्यानंतर ऊसात गेले होते. गणेश रेसिडेन्सी या इमारतीजवळ शेलार यांचे शाळुची शेती आहे. या परिसरात चारी बाजुने इमारती असून मध्येच शेती आहे. या मोकळ्या शेतातूनच रविवारी सकाळी सात वाजता बिबट्या इकडून तिकडे पळत आसल्याचे निदर्शनास आले. इमारतीवरूनच कांहीनी चित्रफित बनवली आहे. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सकाळनंतरचा गोंगाट व गर्दीचा आवाज ऐकून बिबाट्याने शाळुच्या राणात धूम ठोकली. भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बिबट्याची शहरी भागात झेप 

पाणी आणि भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्याचा शहरी भागात संचार वाढला आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील मलकापूर,  आगाशिवनगर, कापील, गोळेश्वर नांदलापूर, जखिणवाडी, चचेगावसारख्या शहरी भागालगतच्या गावांसह ५२ गावांत बिबट्याचा वावर आहे. दुर्गम डोंगराळ भागात दिसणाऱ्या बिबट्याने आता त्याची वेस ओलांडून शंभरांवर शहरी भागातील गावात झेप घेतली आहे. 

रविवारी सकाळी लोहोटिनगर परिसरात भर वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याचे समजले. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोनच वापर व कॕमेरे ट्रॕप लावण्याची तयारी सुरू केली आहे. - तुषार नवले,  वनाधिकारी कराड वन क्षेत्र.

टॅग्स :leopardबिबट्याMalkapurमलकापूर