शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

आरटीओ ब्रेक टेस्ट ट्रॅकला आचारसंहितेचे ग्रहण, प्रस्ताव लटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:54 IST

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मंजूर झालेला ब्रेक टेस्ट ट्रॅकला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. या ट्रॅकच्या बांधणीसाठी वर्ये येथील तब्बल ५ एकर जागा कार्यालयाला मिळाली असली तरी बांधकाम विभागातून लोकसभेची आचारसंहिता लागल्याने टेंडर प्रक्रिया होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देवर्ये येथील ५ एकर जागा उपलब्ध ७० वाहनांची रोज तपासणी; अत्याधुनिक ट्रॅकची आवश्यकता

सागर गुजरसातारा : सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मंजूर झालेला ब्रेक टेस्ट ट्रॅकला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. या ट्रॅकच्या बांधणीसाठी वर्ये येथील तब्बल ५ एकर जागा कार्यालयाला मिळाली असली तरी बांधकाम विभागातून लोकसभेची आचारसंहिता लागल्याने टेंडर प्रक्रिया होऊ शकलेली नाही.सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना पासिंगसाठी कऱ्हाड  येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारावे लागत होते. यामुळे वाहनधारकांचे आर्थिक नुकसान तर होतच होते; पण वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

वर्ये, ता. सातारा येथील अडीच हेक्टर म्हणजे तब्बल ५ एकर जागा ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी आरटीओ कार्यालयाच्या नावावर करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असल्याने वाहनांच्या पासिंगसाठी कऱ्हाडवारी थांबेल, अशी वाहनधारकांमध्ये निर्माण झाली.लोकमतने या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर ट्रॅकसाठी जागा उपलब्ध झालेली आहे. दरम्यान, या जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार होणे गरजेचे आहे. आरटीओ कार्यालयाच्या नावावर ही जागा झालेली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तो तयार केला जाणार आहे. यासाठी टेंडर प्रोसेस होणे आवश्यक होते. मात्र ऐनवेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ती प्रक्रियाही लटकलेली आहे.साताऱ्यात कार्यालय असतानाही फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, वाई, माण, खटाव, कोरेगाव, जावळी, सातारा या तालुक्यांतील वाहनधारकांना डिझेल खर्च करून पासिंगसाठी कऱ्हाडला जावे लागत होते. आनेवाडी, तासवडे येथील टोलनाक्यावर टोल दिल्याशिवाय वाहने पुढे जाऊ शकत नाहीत. ही वाहने साताऱ्यातच पासिंग झाली तर त्यांचा हा खर्च वाचणार, हे लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जागा मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.ब्रेक टेस्ट ट्रॅकची यासाठी गरजव्यावसायिक वापराच्या वाहनांची प्रतिवर्षी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बे्रक टेस्ट घेतली जाते. रिक्षा, टॅक्सी, जीप या वाहनांची बे्रक टेस्ट करून त्यांना वर्षभर वापरासाठी परवाना दिला जातो.

सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी यंत्रणेच्या माध्यमातून ट्रॅक बांधण्यात आलेला आहे. वाहनधारकांना पासिंगसाठी कऱ्हाडला जावे लागत होते. या ट्रॅकमुळे पासिंगची सुविधा उपलब्ध झालेली आहे. रोजी ७० ते ८० व्यावसायिक वाहनांचे बे्रक टेस्ट याठिकाणी केले जात आहेत.- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSatara areaसातारा परिसर