गेली दीड वर्षे करोना महामारी संकटामुळे रंगकर्मी रंगमंचापासून दूर आहेत. अनेक कलाकार, तंत्रज्ञ, तमासगीर, गायक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र शासन त्याकडे लक्ष देत नाही. ते वेधून घेण्यासाठी शुक्रवार (दि. ३) रोजी कराडमध्ये रंगकर्मींचे आंदोलन होत असल्याची माहिती जुगलकिशोर ओझा यांनी दिली.
प्रयोग बंद असल्याने कलाकारांना व्यवसाय नाही. परिणामी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन मात्र मागण्या करूनही त्याची दखल घेत नाही. म्हणूनच शुक्रवार (दि. ३) रोजी सकाळी १०:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रंगदेवतेची पूजा करून व नांदी म्हणून वेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. रंगकर्मींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.