शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कास पठारावर रानगव्याच्या कळपाचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 13:10 IST

दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना, वाहनचालकांना आज पर्वणीच ठरली.

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर शनिवारी सकाळी रानगव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. सकाळी दाट धुक्यात सूर्यकिरणे अंगावर झेलत चौदा रानगव्याच्या कळपाचे दर्शन झाले. परिसरात बऱ्याचदा रानगवे दिसतात. शनिवारी सकाळी चक्क या महाकाय रानगव्यांच्या कळपाचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली. शहराच्या पश्चिमेला २५ किमी अंतरावर कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. नेहमीच जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना, वाहनचालकांना आज पर्वणीच ठरली.बैल कुळातील गवा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. यापूर्वी बहुतांशी वेळा परिसरातून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं ! परंतु कोणत्याही क्षणी गव्याचा हल्ला होऊ शकतो या हेतूने अगोदरच वाहने वळवून लावण्याची त्यांची धडपड दिसते.

कास पठार हे मोठ्याप्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. निसर्गसौंदर्य, चोहोंबाजुला हिरवीगार दाट झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पर्यटनस्थळी रानगव्यांचे वारंवार झुंड दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसते. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठयाच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशीवेळा पाहावयास मिळतो.

वन्यप्राण्यांचा मार्गात अडथळा नकोअचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा तसेच दगड अथवा काहीही वस्तु फेकू नये. त्याला चिडविण्याचा देखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात. परंतु त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. पर्यटनप्रसंगी वन्यपशुंपासुन सावध राहावे असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.

सातारा कास बामणोली मार्गावर नेहमीच वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. सरपटणारे प्राणी, अनेकविध वन्यजीव निर्भिडपणे रस्त्याच्या आसपास, रस्त्याच्या एकाबाजुकडून दुसऱ्या बाजुकडे सहज संचार करत असतात. वन्यजीवांना त्यांचे जीवन जगत असताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता मानवाने घेणे महत्वाचे आहे. - अभिषेक शेलार/कास पठार समिती कर्मचारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर