शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमक विरोधकांना तोंड देताना रामराजेंचे कसब लागणार पणाला!

By admin | Updated: July 11, 2014 00:29 IST

राजेंच्या भूमिकेकडे लक्ष

फलटण : फलटण तालुक्यात असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर तालुक्यातील विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्नामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक काळात ‘सत्ताधारी विरुद्ध विरोधक’ असा सामना अधिक आक्रमक रंगण्याची शक्यता आहे.फलटण तालुक्यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यध्यक्ष रामराजे नाईक-निंंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला आव्हान देण्याचा गेल्या २२ वर्षांपासून विरोधकांनी केलेला प्रयत्न रामराजेंनी उधळून लावलेला आहे. विरोधकांच्या आपापसातील दुहीचा फायदा रामराजेंना झाला आहे. तालुक्यात एकहाती सर्व संस्थावर सत्ता असल्याने कार्यकर्त्यांचा प्रचंड संच रामराजेंकडे आहे. यामध्ये सर्व प्रकारचे कार्यकर्ते आले असले तरी काही गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे राजेगटाला फटका बसू लागला आहे.गेल्या दोन वर्षांत माजी आमदार, चिमणराव कदम व न्यू फलटण शुगर साखरवाडीचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्याशी चांगले जुळवून घेत बऱ्याचशा मोठ्या ग्रामपंचायती विरोधकाकडे वळविण्यात स्वराज्य उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना यश मिळाले आहे. जशास तसे या नात्याने विरोधक मैदानात उतरल्याने तरुण वर्गही त्यांना साथ देऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिल्याने सत्ताधाऱ्यांना अडचणीत आले. तालुक्यात प्रचंड चोऱ्या, मारामाऱ्या दाखल आहेत. पत्रकारांवरील हल्ले, दरोडे तसेच वाळूसम्राट मुजोर बनून तहसीलदार व सहकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. गुंडागिरीत प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ज्यांना मुली आहेत, त्या पालकांना आपल्या मुलीची शाळा, कॉलेजला गेल्यावर परत घरी येईपर्यंत काळजी वाटू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या माजी युवक जिल्हाध्यक्षाच्या घरात घुसून झालेली मारहाण, माजी आ. चिमणराव कदम यांना आलेल्या धमकीचा फोन यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले. या गोष्टीचा फायदा उचलत विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. विरोधकांनी घेतलेल्या निषेध सभेला जनसामान्यातून मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले गेले. त्यांनी प्रचंड टीका सत्ताधाऱ्यांवर केल्याने सध्या सत्ताधारी बॅकफूटवर दिसत आहे. (प्रतिनिधी)तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने रामराजेंना गांभीर्यांनी विचार करण्याची गरज आहे. कार्यकर्ते चुकीचे वागत असतील तर त्यांना समज देण्याचे किंवा राजकिय प्रक्रियेतून बाजूला काढण्याचे धाडस त्यांना दाखवावे लागणार आहे. आक्रमक विरोधकांना रामराजे कसे तोंड देतात, याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.