शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

साताऱ्यातील सजग नागरिकांमुळे दरोडा टळला : कुपर कॉलनीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:41 AM

अलिशान गाडीतून कुपर कॉलनीत येऊन संशयितरीत्या फिरणाºया दोघांना जागृत नागरिकांनी हटकताच संबंधितांनी गाडी जागेवरच सोडून घटनास्थळावरून धूम ठोकल्याची

ठळक मुद्देसीसीटीव्हीत सारा प्रकार कैद; पोलिसांकडून तपास सुरू; नागरिकांचे सर्वत्र कौतुक

सातारा : अलिशान गाडीतून कुपर कॉलनीत येऊन संशयितरीत्या फिरणाºया दोघांना जागृत नागरिकांनी हटकताच संबंधितांनी गाडी जागेवरच सोडून घटनास्थळावरून धूम ठोकल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बझारमधील कुपर कॉलनीमध्ये गुरुवारी रात्री साठेआठच्या सुमारास एका अलिशान गाडीतून दोन युवक आले. गाडीतून उतरल्यानंतर दोघेही कॉलनीत चालत फिरत होते. हा प्रकार एका सतर्क नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कॉलनीतील इतर नागरिकांना याची कल्पना दिली. त्यानंतर कॉलनीतील पृथ्वीराज पवार, राजन धुमाळ, मुकुंदराव मोघे, मोहनराव जाधव, अण्णा गरगटे यांच्यासह दहा ते पंधराजण संबंधितांच्या गाडीजवळ थांबले. तोपर्यंत संबंधित दोन युवक कॉलनीतून फिरून गाडीजवळ आले. नागरिकांनी तुम्ही इथे कोणाकडे आला आहात, याची विचारपूस केली.

त्यावेळी त्या युवकांनी आम्ही बेंगलोर येथून आलो असून, सचिन नावाच्या व्यक्तीकडे पैसे नेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही युवक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले; परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका नागरिकाने हातचलाखी करून कारची चावी काढून घेतली. त्यामुळे दोघेही कारमधून खाली उतरले. हे दोघेही चोर असावेत, अशी नागरिकांना पक्की खात्री पटली, काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. जमाव मोठ्या संख्येने जमू लागल्यानंतर संबंधित दोघा युवकांची भीतीने गाळण उडाली. मोबाईलवर बोलण्याचे नाटक करत अचानक दोघांनीही अंधाराचा फायदा घेत तेथून धूम ठोकली. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते सापडले नाहीत. सुमारे दीड तासानंतर पोलिसांच्या दोन गाड्या कुपर कॉलनीत आल्या. पोलिसांनी कारची डीकी उघडली असता कारमध्ये आठ ते दहा टॉमी, चांदीची भांडी, काही रोकड, कपडे असे साहित्य सापडले. नागरिकांमुळे मोठा दरोडा टळला.पोलीस वेळेत आले असते तर...कॉलनीत संशयितरीत्या फिरणाºया दोघांना नागरिकांनी बराचवेळ बोलण्यात गुंतवून ठेवले होते. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात होता. याचवेळी काहीजण पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. एवढेच नव्हे तर परिसरात असललेल्या दोन पोलीस चौकीतही काहीजण जाऊन आले; परंतु चौकी बंद होती. कंट्रोल रूमपासून आपापल्या ओळखीच्या बºयाच पोलिसांना नागरिकांनी फोन लावले. सरतेशेवटी पोलीस निरीक्षक सारंगकर यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन पोलीस गाड्या त्या ठिकाणी पाठविल्या; परंतु पोलीस जर वेळेत येथे आले असते तर संशयित युवक रंगेहाथ सापडले असते, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. 

संबंधित गाडी चोरीची असावी. कर्नाटकातील गाडी मालकापर्यंत आम्ही तपास केला आहे. लवकरच संबंधिताचा छडा लागेल.-नारायण सारंगकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा शहर