शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

दरड कोसळून पसरणी घाट ठप्प!

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

महाकाय दगड कोसळला : तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत

पाचगणी/बावधन : पाचगणी-वाई घाटातील दांडेघर गावाजवळ दरड कोसळून एक महाकाय दगड रस्त्यावर आल्याने दोन्हीकडील वाहतूक आज, गुरुवारी दुपारी ठप्प झाली. यावेळी दोन्ही बाजूंना अडकलेल्या रुग्णवाहिकांमधील रुग्णांची अदलाबदल करून त्यांना रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले.जिल्ह्यातील पसरणी, केळघर, आंबेनळी, बोरणे घाटांत दरड कोसळण्याचे सत्र पंधरा दिवसांपासून सुरूच आहे. पसरणी घाटात आज पडलेला दगड सुमारे वीस फूट उंचीचा होता. एवढी मोठी दरड पसरणी घाटात कधीच पडली नव्हती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.पाचगणी-वाई घाटात दांडेघर गावापासून सुमारे एक किलोमीटरवर डोंगराच्या बाजूला असणारी दरड दुपारी सव्वातीनच्या सुमारास पूर्ण रस्त्यात कोसळली. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.पाचगणीहून वाईकडे जाणाऱ्या एसटी गाड्या पुन्हा माघारी फिरवून पाचगणी-पाचवडमार्गे मार्गस्थ केल्या, परंतु वाईहून पाचगणीकडे येणारी सर्व वाहने वाहतूक ठप्प झाल्याने जाग्यावरच थांबून राहिली.काही वेळाने नागरिकांनी एका बाजूने रस्ता मोकळा केल्याने केवळ दुचाकी वाहनेच जाऊ लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड बाजूला काढण्यासाठी दोन जेसीबी व एका ब्रेकरच्या साह्याने काम सुरू केले. वाहतूक ठप्प झाल्याने पाचगणीहून वाईकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची एसटीअभावी गैरसोय झाली होती. सायंकाळी सहानंतर एका बाजूने वाहतूक सुरू झाली. जड वाहने मात्र रात्री उशिरापर्यंत अडकून पडली होती. (वार्ताहर)