शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

राम तोच; पण रावण बदललेत!

By admin | Updated: December 20, 2015 00:39 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : फलटण शहरातील कोणत्याच कार्यकर्त्याची गुंडगिरी सहन करणार नाही

फलटण : ‘फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे झालेल्या खुनाचा प्रकार दुर्दैवी असून, तालुक्यात वाढत चाललेल्या गुंडगिरी व दहशतवाद राजेगट कधिही सहन करणार नाही. तसेच याला कोणीच राजकीय पाठबळ देऊ नये. पोलिसांनी कडक भूमिका घेणे गरजेचे असून, शहरातील फ्लेक्सवरही निर्बंध आणण्याबरोबरच अधिवेशनानंतर तालुक्यातील गुंडगिरी संपविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे,’ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. फलटण येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. फलटण तालुक्यात पूर्वी राजकीय कारणावरून मतभेद, हाणामारी व्हायची, डोकी फुटायची; मात्र हे आम्ही गेल्या वीस वर्षांत संपवले असून, राजकीय वादातून कधीही खुनाखुनीचे प्रकार घडलेले नाहीत; मात्र सध्या नवी पिढी कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वी तरुणवर्ग ऐकायचा, थांबायचा आता चित्र बदलले आहे. किरकोळ कारणावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी, पोलीस केस, खुनाचे प्रकार घडू लागलेत, हे चुकीचे आहे. झिरपवाडी येथे झालेला खुनाचा प्रकार राजकीय किंवा जातीय नाही, तर तो त्यांच्यातील वारंवार होणाऱ्या अंतर्गत वादातून झाला. झिरवाडीतील खुनाचा प्रकार दुर्दैवी आहे. खुनाचे प्रकार मनाला वेदना करणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात मोठ्या संख्येने फ्लेक्स लागले आहेत त्यात कोणीही उठसूठ गळ्यात, हातात सोने घालून स्वत:चे फोटो टाकतोय. त्याच्यावर आमचे फोटो टाकतोय, हे सर्व चुकीचे आहे. आमचे त्याला समर्थन नाही. आमच्या नावाचा किंवा फोटोचा वापर करून जर कोणी गैरकृत्य करीत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. गैरकृत्य करणारा कार्यकर्ता व सामान्य जनता निवडण्याची जर आमच्यावर वेळ आली, तर आम्ही सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहू. आमची बांधिलकी जनतेशी आहे, ती कायम राहणार आहे. बॅनरबाजीवर पण आम्ही आळा आणणार असून, उठसूठ उठून आमची परवानगी न घेता कोणी आमचा फोटो टाकत असेल तर ते बंद करणार आहे,’ असेही रामराजेंनी स्पष्ट केले. नवीन पोरं गुन्हेगारी प्रवृत्तीत शिरू लागलेत, त्याला आळा बसला पाहिजे. पोलिसांनी कायदा कठोर राबविला पाहिजे. तरुणपिढी सध्या कोणाचे ऐकत नाही हीच खरी शोकांतिका असून, एवढी पिस्तुले तालुक्यात कोठून आली, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. सध्या वाढत्या हाणामाऱ्या, गुंडगिरी, उठसूठ बंदचे प्रकार घडताहेत हे पूर्णत: चुकीचे आहे. हे जे कोणी घडवतेय त्याला आमचा विरोध आहे. सध्या आपण नागपूर अधिवेशनात व्यस्त असल्याने तालुक्यात फारसे लक्ष देऊ शकत नाही. मात्र अधिवेशन संपल्यानंतर तालुक्यातील दहशतवाद, गुंडगिरी याबाबत लक्ष देणार असून, सामान्य जनतेशीही चर्चा करून उपाययोजना करणार आहोत. कायदा सर्वात मोठा असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी पोलिसांनी केली पाहिजे, असेही रामराजेंनी सांगितले. (प्रतिनिधी) फ्लेक्सवरील फोटोंवर निर्बंध आणणार... तालुक्यात फ्लेक्सवर तुमचे कोणीही फोटो टाकत असल्याचे रामराजेंच्या निदर्शनास आणून देताच, हे बरोबर आहे. आम्हाला माहिती नव्हती, कोण फोटो टाकतोय, उठसूठ फोटो लावायचे तेही अशा स्टाईलने की बोलायला नकोच, असले प्रकार खपवून घेणार नाही. राम तोच आहे; मात्र फ्लेक्सवरचे रावण बदलत चाललेत. त्याला निश्चितच आळा घालू. फ्लेक्सवर कडक निर्बंध आणू. आमचे फोटो वापरायलाही निर्बंध आणू असेही रामराजेंनी स्पष्ट केले. जनतेने थेट आमच्याशी बोलावे कायदा, सुव्यवस्था बिघडविण्याचा यापुढे कोणी प्रयत्न केल्यास ते खपवून घेणार नाही. जनता हीच आमचे सर्वस्व असून सर्वसामान्यांच्या पाठिशी नेहमीच राहणार आहोत. जनतेने थेट आमच्याशी बोलावे, असे आवाहन रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.