फलटण : येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी त्यांच्या गटाकडे सलग तिसऱ्यांदा सत्ता देण्याचे संकेत दिले. ही निवडणूक प्रामुख्याने रामराजे नाईक निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील सत्तासंघषार्मुळे गाजली. उदयनराजेंनी राजे गटाला पराभूत करण्याचे वारंवार आवाहन करूनही सभासदांनी रामराजेंवरच विश्वास ठेवल्याचे दिसून आले. मतमोजणीला मंगळवारी (दि. ७) रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली असून, रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरुच होती. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सुरूवातीला ‘ब’ वर्ग सहकारी संस्था गटाचा निकाल जाहीर केला असून या गटातून चंद्रकांत पवार हे निवडून आले आहेत. या कारखान्यासाठी तिरंगी लढत झाली. श्रीराम पॅनेलचे नेतृत्व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे यांनी केले. श्रीराम बचाव पॅनेलचे नेतृत्व माजी खासदार हिदुंराव नाईक- निंबाळकर व रणजित नाईक- निंबाळकर यांनी केले. तर श्रीराम शेतकरी, कामगार पॅनेलचे नेतृत्व भाजपाचे अनुप शहा यांनी केले. पहिल्या फेरीपासून श्रीराम पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. होळ-गिरवी गट : श्रीराम पॅनेल: पद्मराज सुभाष भोईटे : ३,५७५ , नितीन शाहूराजे भोसले : ३,६६८ , शिवराज संपतराव कदम : ३,४८७ . श्रीराम बचाव पॅनेल: बापूसाहेब केशवराव निंबाळकर : १७६८ , पांडुरंग विष्णू शिंदे : १७४३, तुकाराम बापू शिंदे : १६७०. श्रीराम शेतकरी, कामगार पॅनेल : उत्तम महादेव भोसले : १८४, किसन श्रीपती ढेकळे : १३९, मानसिंग शिवाजी निंबाळकर : १५६जिंती- राजाळे गट :-श्रीराम पॅनेल : शंकर कांतिलाल बेलदार : ३५५१, जालिंदर बापुराव जगताप : ३५९३, शरद विश्वसराव रणवरे : ३५०८. श्रीराम बचाव पॅनेल : नानासाहेब बाबासाहेब मोहिते : १८५५, शिवाजीराव अण्णासाहेब फडतरे : १७९१, संजय भगवानराव सोडमिसे : १७९६, श्रीराम शेतकरी, कामगार पॅनेल: हणमंत कोंडिराम रणवरे : २१६, विानयक तुकाराम शिंदे: १८९, जगन्नाथ सदाशिव यजगर : १२२.फलटण-विडणी गट : श्रीराम पॅनेल : संजीवराजे नाईक निंबाळकर : ३५७६, उत्तम दिनकर चौधरी : ३५५३ , जगू बुवा नाळे : ३४४५ श्रीराम बचाव पॅनेल: नरसिंह गणपत निकम : १९४७, चंद्रकांत गंगाराम नाळे : १७३६, संग्रामसिंह संपतराव महामूलकर : १८०७. श्रीराम शेतकरी, कामगार पॅनेल: चंद्रकांत सदाशिव सूर्यवंशी : १४०, संजय पांडुरंग बर्गे : १३७.निंबळक-गुणवरे गट : श्रीराम पॅनेल : धनाजी द्वारकादास गौंड: ३५८०, बबनराव बाबुराव घोरपडे: ३६३०, तानाजी गोपीनाथ गावडे : ३६११ मते. श्रीराम बचाव पॅनेल : तुकाराम वामन गावडे : १८४५, मारुती विट्ठल कदम : १८३४, बजरंग दिलीप गावडे: १९५४. श्रीराम शेतकरी, कामगार पॅनेल : एकनाथ शंकर धुमाळ: १५१, प्रकाश यशवंत भोसले: १६६ आसू-शिंदेवाडी गट : श्रीराम पॅनेल : मधुकर भानुदास माळवे : ३६९७, अशोक मानसिंग शिंदे : ३६२९ , धनाजी महादेव फाळके: ३६२७ . श्रीराम बचाव पॅनेल : हरिश्चंद्र रघुनाथ पवार : १८६३, राजाराम हरिबा पवार : १८६७, प्रदीपकुमार नामदेव शिंदे : १८७०. श्रीराम शेतकरी, कामगार पॅनेल: मारुती दगडू पन्हाळे : १४०, राहुल सदाशिव देशमुख : १६७. 'ब' वर्ग सहकारी संस्था मतदार संघ: चंद्रकांत दत्ताजीराव पवार : ८१, प्रदीप बाबासाहेब मोहिते: १६.
‘श्रीराम’मध्ये ‘रामराजे’च !
By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST