शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

मराठ्यांच्या राजधानीत राजमुद्रेचा दंडक गायब

By admin | Updated: February 26, 2015 00:18 IST

कमानी हौद : इतिहासप्रेमींमध्ये नाराजी; दंडक पूर्ववत करण्याची मागणी

सचिन काकडे -सातारा -- मराठ्यांची राजधानी म्हणून अभिमानाने सर्वत्र मिरविणाऱ्या साताऱ्यात राजमुद्रेचा दंडक गायब झाला आहे. शहरातील ऐतिहासिक कमानी हौदातील भिंतीवर कोरण्यात आलेल्या शिवकालीन षटकोनी राजमुद्रेशेजारी चार दंडक असून, यापैकी एक दंडक अनेक वर्षांपासून गायब आहे. यामुळे इतिहासपे्रमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.कमानी हौदाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याला सतरा कमानींचा हौद म्हणूनही संबोधले जाते. एकेकाळी हत्तींना पाणी पिण्यासाठी याठिकाणी आणले जात असे. या कमानी हौदाच्या देखभालीची जबाबदारी सध्या पालिका प्रशासनाकडे आहे. या हौदाचे जेव्हा सुशोभीकरण करण्यात आले, तेव्हा हौदाच्या मधोमध असणाऱ्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी षटकोनी आकारातील राजमुद्रा कोरण्यात आली. राजमुद्रेशेजारी चार दंडक ही कोरण्यात आले. मात्र, यामधील एक दंडक गेल्या अनेक वर्षांपासून गायब झाला आहे. त्यामुळे राजमुद्रेची शोभा कमी झाल्याचे दिसून येत आहे.पालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी कमानी हौदाला रंगरंगोटीचे काम करण्यात आले. याच्या सुरक्षेची देखील पुरेपूर काळजी घेऊन संपूर्ण हौद लोखंडी रेलिंगने बंदिस्त करण्यात आला. मात्र राजमुद्रेशेजारील दंडकाचा सर्वांनाच विसर पडलेला दिसून येत आहे. राजमुद्रेशेजारील एका दंडकाचे काय झाले? हे कोणालाच माहीत नाही. मात्र, याच्या दुरुस्तीकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. यामुळे राजमुद्रेची शोभा वाढविण्यासाठी दंडक पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.कमानी हौदाचे सुशोभीकरण केल्यानंतर या परिसराचे सौंदर्य वाढले. हौदाच्या भिंतीवर असणाऱ्या राजमुद्रेचा दंडक नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत. दंडक लवकरात लवकर बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल.- सुजाता राजेमहाडिक, नगरसेविकाबाह्य सुरक्षा रामभरोसेपालिकेच्या वतीने कमानी हौदाच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र नागरिकांचे मुख्य आकर्षण असणारा येथील कारंजा नेहमीच बंद अवस्थेत असतो. लोखंडी रेलिंग बसविल्यामुळे या हौदाची अंतर्गत सुरक्षा जरी मजबुत झाली असली तरी बाह्य सुरक्षेचा प्रश्न मात्र जैसे थे आहे. याठिकाणी देखरेख करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे भटक्या जनावरांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. याबरोबरच रात्रीच्यावेळी मद्यपीं देखील याठिकाणी ठाण मांडून बसतात. याबाबत पालिकेने ठोस पावले उचलावित असे नागरिकांचे म्हणने आहे.